अमरावतीत भीषण आग, तीन घरांसह दुकान खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 22:18 IST2019-03-17T22:18:03+5:302019-03-17T22:18:57+5:30
आगीमुळे घरातील भौतिक वस्तूंसह दैनंदिन जीवनावश्यक साहित्य खाक झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

अमरावतीत भीषण आग, तीन घरांसह दुकान खाक
अमरावती : स्थानिक छत्रसालनगरात भीषण आग लागल्याने तीन घरांसह एक दुकान खाक झाले. ही घटना गुरुवारी रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये सुदैवाने मनुष्यहानी टळली. अमरावती महापालिका अग्निशमन विभागाच्या चमुने आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, आग उशिरापर्यंत धगधगत होती.
आगीमुळे घरातील भौतिक वस्तूंसह दैनंदिन जीवनावश्यक साहित्य खाक झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आगीच्या लक्ष्यस्थानी ठरलेल्या दुकानातील विविध साहित्य जळून खाक झाले. मात्र, नुकसानीची आकडेवारी कळू शकली नाही.