अमरावती विभागात ८१३ गावे गारपिटीने बाधित, चार व्यक्तींसह १२ गुरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 04:02 PM2018-02-12T16:02:56+5:302018-02-12T16:07:22+5:30

विभागात रविवारी सकाळी झालेल्या वादळासह गारपीट व  अवकाळी पावसामुळे ८१३ गावांमध्ये किमान ८० हजार हेक्टरमधील रबी व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आपत्तीमध्ये वीज अंगावर पडून चार व्यक्ती व १२ गुरांचा मृत्यू झाला.

In Amravati division, 813 villages were hit by hail, 12 cattle deaths with four people |  अमरावती विभागात ८१३ गावे गारपिटीने बाधित, चार व्यक्तींसह १२ गुरांचा मृत्यू

 अमरावती विभागात ८१३ गावे गारपिटीने बाधित, चार व्यक्तींसह १२ गुरांचा मृत्यू

Next

अमरावती - विभागात रविवारी सकाळी झालेल्या वादळासह गारपीट व  अवकाळी पावसामुळे ८१३ गावांमध्ये किमान ८० हजार हेक्टरमधील रबी व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आपत्तीमध्ये वीज अंगावर पडून चार व्यक्ती व १२ गुरांचा मृत्यू झाला. चार व्यक्ती जखमी झाले आहेत. मात्र, यंत्रणाद्वारा सर्वेक्षण अद्याप सुरू झालेले नाही. 
विभागात रविवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटमुळे सर्वाधिक ३८८ गावांमध्ये बुलडाणा जिल्ह्यात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात ३८४, अकोला ३१ व वाशिम जिल्ह्यात १० गावांमध्ये नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली तरी नुकसान मात्र फारसे झालेले नसल्याचा अहवाल आहे. अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान रबीच्या गहु व हरभºयाचे झाले. शेतकºयांनी तुरीची सवंगणी करून ढीग लावले होते, ते ओले होऊन नुकसान झाले. झाडावरील कापूस ओला झाला. कांद्यासह भाजीपाला पिकांचेही प्रचंड नुकसान झाले. संत्र्याच्या मृग बहराची फळगळ झाली, तर आंबिया बहराचे प्रचंड नुकसान झाले. या सर्व जिल्ह्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन पीकविमा कंपन्यांसोबत बैठक घेण्याच्या सूचना कृषी मंत्र्यांनी दिल्या आहेत. बाधित क्षेत्राच्या सर्वेक्षणाचे आदेश दिल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले असले तरी यंत्रणेद्वारा प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येऊन नुकसानीचा अंदाज वर्तविला. मात्र, प्रत्यक्ष सर्वेक्षणाला अद्यापही सुरूवात झालेली नाही.

 तीन जणांचा मृत्यू 
 वाशिम जिल्ह्यात महागाव येतील यमुनाबाई हुंभाड (७५) बुलडाणा जिल्ह्यात गिरोली येथे निकिता राठोड (१६) अमरावती जिल्ह्यात नायगाव येथे गंगाधर राठोड (७३) यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर बुलडाणा जिल्ह्यात वळती येथे रस्त्यावरील झाड अंगावर पडून ज्ञानगंगापूर येथील अजय महाले गंभीर जखमी झाल होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मेहकर येथे दोन, संग्रामपूर येथे तीन, वरूड येथे सात अशा एकूण १२ गुरांचा वीज कोसळून मृत्यू झाला.

Web Title: In Amravati division, 813 villages were hit by hail, 12 cattle deaths with four people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.