शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर वर्धाची सर्व दारे उघडली

By admin | Updated: July 27, 2014 23:29 IST

शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाचा जलस्तर वाढल्याने रविवारी दुपारी १२ नंतर धरणाचे सर्व तेराही दरवाजे उघडण्यात आले. सुरूवातीला सकाळी १० वाजता

मोर्शी : शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाचा जलस्तर वाढल्याने रविवारी दुपारी १२ नंतर धरणाचे सर्व तेराही दरवाजे उघडण्यात आले. सुरूवातीला सकाळी १० वाजता अप्पर वर्धा धरणाचे ७ आणि १२ वाजताच्या सुमारास संपूर्ण १३ दरवाजे उघडण्यात आले. अप्पर वर्धा धरणातून दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ४२५० घनमीटर प्रतिसेकंद एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे. आष्टी मार्गावरील पूल धरणाच्या पाण्यात बुडाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अप्पर वर्धा धरणाची महत्तम जलसंचय क्षमता ३४२.५० मीटर इतकी आहे. परंतु पावसाच्या दर महिन्यात जलस्तर किती असावा, याचे नियोजन करण्यात येते. जुलै महिन्यात ३४१.०४ मीटर एवढा जलस्तर निर्धारित करण्यात आला. दोन दिवसांपूर्वीच धरणातील जलस्तर ३४१.३२ मीटरपर्यंत पोहोचला होता. आॅगस्ट महिन्यात जलपातळी ३४२.०२ इतकी ठेवायची असल्यामुळे धरण प्रशासनाने ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतली होती. परंतु शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने नदी नाल्यांना पूर आला. रविवारी सकाळी धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळे सकाळी १० वाजता धरणाची १३ पैकी ७ दारे उघडून ३३३ घनमीटर प्रतिसेकंदनुसार पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. धरणस्थळी उपविभागीय अभियंता मेश्राम, शाखाप्रमुख साने आपल्या कर्मचाऱ्यांसोबत ठाण मांडून बसले होते. धरणातील पाण्याची वाढती आवक पाहता दुपारी १२.३० वाजता धरणाचे सर्व १३ व्दार उघडण्यात येऊन १६४३ घनमीटर प्रतिसेकंद इतका पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे धरणासमोरील आष्टी मार्ग पाण्याखाली आल्याची माहिती आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास धरणात पाण्याचा येवा ४२५० घनमीटर प्रतिसेकंद इतका वाढला. याच दराने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून सातत्याने पाऊस बरसत आहे. त्यात अजूनही खंड पडलेला नाही. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस झाल्याने वर्धा नदीला महापूर आला आहे. परिणामी अप्पर वर्धा धरणात पाण्याचा येवा झपाट्याने वाढत आहे. पुढेही पाण्याचा अंदाज असल्याने आणखी दारांची उंची वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)