शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

अमरावतीला वायुप्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 01:24 IST

जिल्ह्यात वायुप्रदूषणाचे प्रमाण अलीकडे जास्त वाढले आहे. नादुरुस्त व कालबाह्य झालेल्या वाहनांमुळे यामध्ये भर पडत आहे. एसटी महामंडळाच्या किमान २० टक्के बसेस घातक धूर सोडत असल्याने शहराचा श्वास गुदमरत असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांकडून होत आहे, हे तेवढेच वास्तव आहे

ठळक मुद्देसावधान : दूषित पाणी अन् ध्वनी प्रदूषणही, कारखान्यांची रासायनिक घाण नाल्यात

जागतिक पर्यावरण दिनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात वायुप्रदूषणाचे प्रमाण अलीकडे जास्त वाढले आहे. नादुरुस्त व कालबाह्य झालेल्या वाहनांमुळे यामध्ये भर पडत आहे. एसटी महामंडळाच्या किमान २० टक्के बसेस घातक धूर सोडत असल्याने शहराचा श्वास गुदमरत असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांकडून होत आहे, हे तेवढेच वास्तव आहेकेंद्र व राज्य शासनाद्वारे प्रदूषण थांबविण्यासाठी कायदे आहेत. प्रदूषण होऊ नये, यासाठी शाळा-महाविद्यालयापासून स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर जनजागृती करीत आहेत. दुसरीकडे राज्य शासनाचाच उपक्रम असलेल्या राज्य परिवहन महामंडळाद्वारे प्रदूषणाच्या विषयाकडे कानाडोळा होत असल्याचे वास्तव आहे. अमरावती जिल्ह्यात ४५० वर बसेस आहेत. यामध्ये अनेक गाड्यांची वैधता संपल्यानंतरही रस्त्यावर धावताहेत अन् घातक धूर सोडत आहेत. यामुळे सकाळपासून प्रदूषणात भर पडत असताना प्रादेशिक परिवहन विभागाद्वारे पायबंद घातले जात नाहीत. या बसेसची पीयूसी तपासणी करण्याचे भान ना महामंडळाच्या अधिकाऱ्यांना, ना आरटीओ विभागाला आहे.बांधकाम साहित्याची वाहतूक करणाºया ट्रकचा धूर प्रदूषण वाढवित आहेत, याकडेदेखील दुर्लक्ष केले जाते. ग्रामीण भागाचे चित्र वेगळे नाही. किंबहुना यापेक्षा जास्तच आहे. येथील आॅटोरिक्षांची नियमित तपासणी होत नाही. सगळा कारभारच एकूण विस्कळीत. कुठेही कचरा जाळला जातो. स्वच्छतेच्या नावावर पर्यावरणाचा ºहास होत आहे. परिणामी आरोग्य समस्या उद्भवत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे बाल्यावस्थेपासूनच रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. त्यामुळे आबालवृद्धांना विविध आजार होत आहेत. सगळे जीवनचक्राचा ºहास या प्रदूषणामुळे होत आहे. केवळ वायुप्रदूषणच नव्हे तर जलप्रदूषणदेखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यावर वेळीच नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे.झाडे किती लावली?महापालिकेने गतवर्षी १३ कोटी उपक्रमातून २० हजार २०० वृक्षलागवड केली. १८३ स्थळांवर रोपे लावली. त्यापैकी ६४ टक्के रोपे जगविण्यात यश मिळाले आहे. महानगरात एकूण १०५ उद्याने आहेत.अकोला टी-पॉइंट ते नागपूर ंिरंग रोड निर्मितीदरम्यान कापल्या गेलेल्या झाडांच्या तुलेनत १० हजार झाडे जगविण्याचा करारनामा आहे. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आतापर्यंत ६ हजार २०० झाडे जगविली आहेत. महापालिकेने ७२ लाख रुपयांचे डिपॉझिट केले आहे.जुने बायपासलगत वनविभागाने नव्याने आॅक्सिजन पार्कची निर्मिती केली आहे. एका वर्षात २० फुटापर्यंत वृक्ष वाढविण्याची किमया येथे साधली आहे. विविध प्रजातीचे ४०० पेक्षा जास्त वृक्ष जगविली आहे.अंबानगरीची हिरवी ओळख असलेल्या वडाळी गार्डनमध्ये लहान-मोठी अशी २०० वृक्षे आहेत. विशालकाय वृक्षांनी हा परिसर आच्छादलेला असून, येथे नर्सरीद्वारे रोपे तयार केली जातात.

उपक्रम, जागृती, व्यवस्थापनावर भरशहराची लोकसंख्यावाढ झपाट्याने होत असताना प्रदूषणाचा स्तरदेखील वाढतो आहे. याला आळा बसावा, यासाठी महापालिका प्रशासनाद्वारे सर्व स्तरावर जनजागृती होत आहे. प्लास्टिकबंदी असताना काही व्यावसायिक व हातगाडीवर प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर होत असल्याने वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात दररोज धाडसत्र राबविले जाऊन प्लास्टिकच्या गैरवापरासाठी दंडाची आकारणी होत आहे. महानगराचा जलस्तर वाढावा यासाठी जलजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात आयुक्त संजय निपाणे यांच्या मार्गदर्शनात राबविली जात आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणन आयुक्तांनी महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी-कर्मचाºयाला त्याच्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले आहे. आजमितीस १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी दोन आठवड्याच्या अवधीत ही यंत्रणा घरी बसवून आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. यंदा २० हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे, तर पर्यावरण दिननिमित्त बुधवारी महापालिकाद्वारे वृक्षलागवडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. केवळ वृक्षलागवडच नाही, तर संवर्धनालाही तेवढेच महत्त्व दिले जात आहे. शहराचे वैभव असलेल्या वडाळी तलावाचा गाळ काढण्याची मोहीम आता एक चळवळ बनली आहे.प्रदूषणमुक्त अमरावतीसाठी महापालिकेच्या सर्वच विभागांद्वारे सर्व स्तरावर जनजागृती सुरू आहे. प्लास्टिकबंदी, घनकचरा व्यवस्थापन, नाले व नाल्याची नियमित सफाई, प्रभागनिहाय स्वच्छता कंत्राट, ओला व सुका कचरा वेगळा, वृक्षलागवड व संवर्धन, जलजागृती अभियान याद्वारे प्रदूषणमुक्तीसाठी लढा सुरू आहे.- संजय निपाणे, आयुक्तशहरात पर्यावरणाचे उल्लंघन ही गंभीर बाब आहे. मानवी आरोग्यासाठी प्रदूषण हे घातक आहे. जलप्रदूषण, वायुप्रदूषण, जमिनीचे प्रदूषण, ई-वेस्ट, बायोहझाडर््स यांसह अनेक बाबींमुळे प्रदूषण वाढतेच आहे. जिल्ह्यात विशेषत:स्थानिक स्वराज्य संस्थाच्या बेपर्वा धोरणाचा फटका मानवी आरोग्यास बसत आहे. कचरा जाळला जाणे, घनकचºयाचे व्यवस्थापन नसणेयासह अन्य बाबींमुळे प्रदूषण वाढतच आहे.- नंदकिशोर गांधी, तज्ज्ञ

टॅग्स :pollutionप्रदूषण