शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
6
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
7
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
8
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
9
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
10
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
11
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
12
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
13
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
14
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
15
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
16
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
17
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
18
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
19
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
20
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘एम्स’ची जागा ठरणार आज!

By admin | Updated: August 23, 2014 03:05 IST

नुकतेच अर्थसंकल्पात विदर्भात ‘एम्स’ रुग्णालयाची (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) घोषणा झाली.

नागपूर : नुकतेच अर्थसंकल्पात विदर्भात ‘एम्स’ रुग्णालयाची (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) घोषणा झाली. ‘एम्स’ सुरू करण्याबाबत शासनस्तरावर शनिवारी बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड, सचिव मनीषा म्हैस्कर व पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेचे सहसचिव संदीपकुमार नायक उपस्थित राहणार आहे. यावेळी नागपुरात ‘एम्स’ची जागा ठरण्याची दाट शक्यता आहे. कालपर्यंत एम्सच्या धर्तीवर मेडिकल, मेयोचा विकास असा शब्दप्रयोग लोकप्रतिनिधींकडून व्हायचा, मात्र विदर्भात एम्सची घोषणा झाल्यापासून वैद्यकीय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. सध्याच्या स्थितीत डॉक्टर-रुग्णाचे प्रमाण पाहिल्यास दोन हजार रुग्णांमागे एक डॉक्टर असे आहे. हे प्रमाण हजार रुग्णांमागे एक डॉक्टर असे आणण्यासाठी, आरोग्य क्षेत्रातील संशोधन वाढविण्यासाठी व उत्तम आरोग्य सेवा देणे ही एम्सचे कर्तव्य आहे. यामुळे विदर्भातील आरोग्य क्षेत्रात बदल घडण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भोपाळ (मध्यप्रदेश), भुवनेश्वर (ओरिसा), जोधपूर (राजस्थान), पाटणा (बिहार), रायपूर (छत्तीसगड) ऋषिकेश (उत्तराखंड) या नंतर आता विदर्भात एम्स होऊ घातले आहे. शनिवारी या संदर्भातील बैठक रविभवनात होणार आहे. (प्रतिनिधी)