शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

कपाशी, सोयाबीनसाठी २५० कोटींची मिळणार मदत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 12:16 IST

Amravati : हेक्टरी पाच हजारांची शासन मदत ऑनलाइन पेरा नोंदविला असेल तरच लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाने कपाशी व सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात घट झाली व वर्षभर हमीभावही शेतकऱ्यांच्या पदरी पडला नाही. त्यामुळे या दोन्ही पिकांना हेक्टरी पाच हजार व दोन हेक्टरच्या मर्यादेत शासन मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने सोमवारी जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान २५० कोटींची मदत मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात या दोन्ही पिकांचे ५.१० लाख हेक्टर क्षेत्र होते.

दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला आठ ते दहा हजारांपर्यंत भाव मिळाला होता. त्यामुळे गतवर्षीदेखील मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती, त्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमीभावदेखील मिळाला नाही. पावसाअभावी सरासरी उत्पन्नात घट झालेली असताना भावदेखील नसल्याने पिकांचा उत्पादन खर्च निघाला नाही. कपाशी पिकाचीदेखील हीच स्थिती असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यामुळे कपाशी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार व दोन हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता व याबाबतचा आदेश सोमवारी जाहीर केला.

गतवर्षी सोयाबीनचे २,५२,५५१ हेक्टर व कपाशीचे २२,६१,४२७ हेक्टरमध्ये क्षेत्र होते. त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली नाही, असे गृहीत धरता किमान पाच लाख हेक्टरसाठी २५० कोटींचा लाभ शेतकऱ्यांच्या पदरी पडण्याची शक्यता आहे. याबाबत शासनादेश जारी झाल्याने शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी मदत मिळण्याची शक्यता आहे.

ई-पीक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच लाभदोन वर्षापासून खरिपाचा पीक पेरा ऑनलाइन नोंदविण्यात येत आहे. यामध्ये मोबाइल अॅपद्वारे ज्या खातेदारांनी ई-पीक पाहणी केली त्याच शेतकऱ्यांना शासन मदतीचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी राहिली होती, ती प्रक्रिया नंतर तलाठी यांच्याद्वारा पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे दोन हेक्टर मदित सर्वच शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.

खातेदार किती, प्रशासनातच संभ्रमखरीप २०२३ मध्ये किती शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली, याची माहिती महसूलकडे उपलब्ध आहे. मात्र कपाशी व सोयाबीनचा पीकनिहाय ऑनलाइन पेरा, नोंद झालेले क्षेत्र किती, याची माहिती उपलब्ध नसल्याचे प्रशासनाने सांगितले. ई-पीक पाहणी हा महसूलचा प्रकल्प असल्याने आमच्याकडे याची माहिती उपलब्ध नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

खरीप २०२३ मधील कपाशी, सोयाबीनचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)तालुका                 सोयाबीन               कपाशीधारणी                      ७०२१                     १०४१६चिखलदरा                ७८३५                      ३०४९अमरावती                 ३१२२०                    १२००८भातकुली                 २८८६५                    १२८२४नांदगाव खं.              ४७०४७                    ६९३०चांदूर रेल्वे               २४९०५                    ८३१८तिवसा                     १७७०५                   १६७७३मोर्शी                       १४३९९                    ३२०२१वरूड                      १५८४                     २७९५८दर्यापूर                    १३४८७                    ४८७३६अंजनगाव                १३१७९                     २०७०६अचलपूर                  ८७२८                      ९९२४चांदूरबाजार              ९४५०                     १३५४९धामणगाव               २१८३१                     २३८१२एकूण                   २५२५५१                    २६१४२७

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती