शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
3
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
4
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
5
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
6
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
7
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
8
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
9
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
10
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
11
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
12
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
13
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
14
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
15
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
16
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
18
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
19
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा १० रुपयात मिळणार रेल्वेचे प्लॅटफार्म तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 05:00 IST

प्लॅटफार्म तिकिटासाठी ११ मार्चपासून ५० रुपये मोजावे लागत होते. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाविषयी सामान्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. अखेर चार महिन्यांनंतर प्लॅटफार्म तिकिटासाठी पुन्हा १० रुपयेच द्यावे लागतील. महागड्या तिकीटमुळे रेल्वे फलाटावर जाण्याऐवजी बाहेरूनच नातेवाईक, आप्तांना निरोप दिला जात होता. आता प्लॅटफॉर्म तिकीटचे दर कमी झाल्याने फलाटावर प्रवाशांएवढीच त्यांना सोडणाऱ्या आप्तांची राहणार आहे. 

ठळक मुद्दे१२ जूनपासून अंमलबजवाणी सुरू, खासदारांची मागणी रेल्वेमंत्र्यांकडून मान्य

 लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. आता संचारबंदीत शिथिलता मिळाल्याने १२ जूनपासून हे तिकीट पुन्हा १० रुपयांचेच करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या आप्तांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी खासदार नवनीत राणा यांची ही मागणी मंजूर केली. 
प्लॅटफार्म तिकिटासाठी ११ मार्चपासून ५० रुपये मोजावे लागत होते. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाविषयी सामान्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. अखेर चार महिन्यांनंतर प्लॅटफार्म तिकिटासाठी पुन्हा १० रुपयेच द्यावे लागतील. महागड्या तिकीटमुळे रेल्वे फलाटावर जाण्याऐवजी बाहेरूनच नातेवाईक, आप्तांना निरोप दिला जात होता. आता प्लॅटफॉर्म तिकीटचे दर कमी झाल्याने फलाटावर प्रवाशांएवढीच त्यांना सोडणाऱ्या आप्तांची राहणार आहे. 

मुंबई एक्स्प्रेस, सुरत पॅसेंजरचे आरक्षण सुरू
अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ही गाडी १ जुलै, तर  अमरावती-सुरत फास्ट पॅसेंजर ३ जुलैपासून सुरू होणार आहे. या दोन्ही रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे सुरू झाले आहे. कोरोनाकाळात बंद झालेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरू होत असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कोरोनाकाळात विशेष रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या. त्या सुरू कराव्या, अशी प्रवाशांची मागणी आहे. 

मार्च महिन्यात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना प्लॅटफॉर्म तिकीटचे दर कमी करण्यासंदर्भात निवेदन सादर केले होते. त्याची दखल रेल्वेमंत्र्यांनी घेतली आहे. 
- नवनीत राणा 
खासदार, अमरावती

प्लॅटफार्मचे तिकीट अगोदर ५० रुपये  होते. आता १२ जूनपासून पुन्हा १० रुपये घेण्यात येत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून तसे पत्र प्राप्त झाले आहे.
- पी.के. सिन्हा 
प्रबंधक, बडनेरा रेल्वे स्थानक.

 

टॅग्स :railwayरेल्वे