अमरावती : लग्नासाठी स्थळ पाहिल्याची बतावणी करीत तरुणीला अपहरण करून राजस्थानमध्ये विकल्याची धक्कादायक घटना अमरावतीत उघडकीस आली. तेथे एका तरुणाशी लग्न लावून दिल्यानंतर तिला घरात डांबून ठेवल्याची तक्रार पीडिताच्या कुटुंबीयांनी शनिवारी फे्रजरपुरा पोलिसांत नोंदविली आहे.याप्रकरणी पीडिताच्या आईच्या तक्रारीवरून फे्रजरपुरा पोलिसांनी आरोपी शोभाराम चंदेल (रा. गोटाण, जिभो पालगड, जोधपूूर, राजस्थान), खुशाल चौधरी व सुषमा खुशाल चौधरी (दोन्ही रा. गणेश धाबा, तागोंटाण, जोधपूर, राजस्थान) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३४२, ३४४, ३६६, ३७०, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. आदर्शनगरातील तक्रारकर्ता ४२ वर्षीय महिला घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. त्यांच्या २४ वर्षीय मुलीच्या लग्नासाठी स्थळ पाहत असताना, त्यांची ओळख खोलापुरी गेट येथील रहिवासी सुमन ऊर्फ संगीता जिरापुरे हिच्याशी झाली. मुलीसाठी स्थळ पाहण्याच्या बहाण्याने संगीताने पीडितासह तिच्या आईला बडनेरा रेल्वे स्थानकावर बोलाविले आणि जोधपूरला नेले. तेथील रहिवासी खुशाल चौधरी व सुषमा चौधरी यांच्या घरी पीडितासह तिच्या आईला नेले. त्या ठिकाणी काही मुलांचे छायाचित्र दाखवून एका मुलासाठी पसंती मिळविली. यानंतर आर्य समाजमंदिरात नेऊन बळजबरीने शोभाराम चंदेल याच्याशी लग्न लावून दिले आणि त्याच्या घरी डांबून ठेवले. मुलीच्या इच्छेविरुद्ध तिचे अपहरण करून विकल्याचे पीडिताच्या आईच्या निदर्शनास आले. या घटनेची तक्रार पीडिताच्या आईने शनिवारी फे्रजरपुरा पोलिसांत नोंदविली.मुलीचे अपहरण करून तिचे जबरीने लग्न लावून विक्री केल्याची तक्रार आईने दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.- आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक, फे्रजरपुरा ठाणे.
अपहरणानंतर अमरावतीच्या तरुणीची राजस्थानात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:04 IST
लग्नासाठी स्थळ पाहिल्याची बतावणी करीत तरुणीला अपहरण करून राजस्थानमध्ये विकल्याची धक्कादायक घटना अमरावतीत उघडकीस आली. तेथे एका तरुणाशी लग्न लावून दिल्यानंतर तिला घरात डांबून ठेवल्याची तक्रार पीडिताच्या कुटुंबीयांनी शनिवारी फे्रजरपुरा पोलिसांत नोंदविली आहे.
अपहरणानंतर अमरावतीच्या तरुणीची राजस्थानात विक्री
ठळक मुद्देघरात ठेवले डांबून : कुटुंबीयांची पोलिसांत तक्रार