आईसोबत प्रेमसंबंध, मुलीची अडवणूक; गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: March 3, 2023 18:10 IST2023-03-03T17:21:01+5:302023-03-03T18:10:10+5:30

पिडिताच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण

Affair with mother; molestation of daughter; Filed a case | आईसोबत प्रेमसंबंध, मुलीची अडवणूक; गुन्हा दाखल

आईसोबत प्रेमसंबंध, मुलीची अडवणूक; गुन्हा दाखल

धारणी (अमरावती) : एका महिलेशी प्रेमसंबंध असणाऱ्या आरोपीने तिच्या १७ वर्षीय मुलीवर वाईट नजर रोखल्याचा प्रकार धारणी येथे उघड झाला आहे. याप्रकरणी धारणी पोलिसांनी २ मार्च रोजी आरोपी संदीप तोटे (रा. धारणी) याच्याविरूध्द विनयभंग, मारहाण, धमकी व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.

७ जानेवारी ते २ मार्च या कालावधीत आरोपीने आपला पाठलाग करून विनयभंग केल्याचे त्या अल्पवयीन मुलीने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार, आरोपीचे पिडिताच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. तो नेहमी तिच्या घरी येजा करायचा. त्यामुळे तो पिडिताच्या ओळखीचा आहे.

दरम्यान तिची आई घरी नसताना आरोपी तेथे गेला. आई कुठे आहे, अशी विचारणा केल्यावर ती घरी नाही, असे उत्तर तिने दिले. त्यावेळी तो अनधिकृतपणे तिच्या घरात शिरला. तथा तिचा विनयभंग केला. त्यानंतर पिडिता ही ज्यावेळी शाळेत ये जा करत होती, तेव्हा आरोपीने तिची अनेकदा अडवणूक केली. त्यावेळी त्याने त्या प्रकाराची वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. दरम्यान काही दिवसांनी संदीप तोटे हा आपल्या मुलीची छेड काढत असल्याचे तिच्या आईला माहिती झाले. त्यामुळे तिने त्याला जाब विचारला. त्यावेळी त्याने पिडिताच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तथा जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर तिने १ मार्च रोजी सकाळी धारणी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरूद्ध तक्रार नोंदविली.

Web Title: Affair with mother; molestation of daughter; Filed a case