शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन विद्यार्थिनीचे साहस ठरले प्रशंसनीय

By admin | Updated: September 10, 2016 00:23 IST

मामाने अपहरण केलेल्या पांढरी खानमपूरच्या विद्यार्थिनीने या संकटातही धीर सोडला नाही.

धैर्य : जंगलात एकटीने काढली रात्रअंजनगाव सुर्जी : मामाने अपहरण केलेल्या पांढरी खानमपूरच्या विद्यार्थिनीने या संकटातही धीर सोडला नाही. गळ्याला मामाने चाकू लावल्यावर ती बेशुद्ध झाली. मामा घटनास्थळावरून पळून गेला, ती शुद्धीवर आल्यावर अकोलखेड, ता. अकोट या सातपुड्याच्या पायथ्या शेजारच्या शेतात अंधारात एकटीच होती. तिला पाहण्यासाठी पुन्हा तिचा मामा आला व जोरजोराने तिला हाकाही मारल्या. पाण जिवाच्या धाकाने ती दडून बसली. रात्री गावकरी सुद्धा टॉर्च घेऊन शोधताना तिला दिसले पण त्यांची ओळख न पटल्याने व हे मामाचेच साथीदार असल्याचा संशय आल्याने ती कडब्याच्या गंजीत दडून बसली. भयान जंगलात, अंधाऱ्या रात्री या अल्पवयीन विद्यार्थिनीने दाखविलेले साहस प्रशंसनीय आहे. गावकऱ्यांनी तिला सकाळी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर तिने अकोट पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अंधारातही रात्र काढल्याची प्रेरणा आपणास 'सावधान इंडिया' या मालिकेतून मिळाल्याचे सांगितले. एक क्षण ओढणीने गळफास घेण्याचा तिने विचारसुद्धा केला. पण संकटात धीर सोडू नका, संकटाचा सामना करा, हे मालिकेतील विचार तिला त्यावेळी प्रेरणादायी ठरले. हा संपूर्ण घटनाक्रम अतिशय नाट्यपूर्ण असून अकोलखेडच्या गावकऱ्यांना मात्र ही संत गजानन महाराजांची कृपा वाटते. याच परिसरात गजानन महाराजांनी अनेक चमत्कार केल्याने हा परिसर भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. (प्रतिनिधी)वसतिगृहाने बसविले नियम धाब्यावरपांढरीच्या समाजकल्याण वसतिगृहात केवळ एक महिन्याआधी १५ आॅगस्टच्या दिवशी शालेय प्रशासनाने विद्यार्थ्यांना सूचना दिल्या की, आपणास बाहेर जायचे असेल तर फक्त आई-वडिलांसोबत जाता येईल. पण या प्रकरणात विद्यार्थिनीला आई-वडील नसताना का सोडण्यात आले? याचे उत्तर वसतिगृह प्रशासनाजवळ नाही. मुख्याध्यापक प्रवीण जीरापुरे मात्र समर्थन करताना सांगतात की आम्ही मुलीच्या अर्जानुसार तिला सुटी दिली. मात्र प्रकरणात नियमांची सीमा पार पायमल्ली झाल्याचे दिसून येते.मामाचा इतिहास गुन्हेगारी प्रवृत्तीचाराजू स. आठवले, रा.पंचशीलनगर अकोला हा विद्यार्थिनीचा मामा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याचेवर अकोला भागात अशाच प्रकारच्या गुन्ह्याची नोंद आहे व त्याने कारावासही भोगला आहे. काही दिवस राजू हा पांढरी व अंजनगावातही राहत होता. घटनेचे दिवशी त्याने मित्राला काही वेळासाठी मागवून आणलेली दुचाकी चार दिवसापासून त्याने परत केली नव्हती. पोलिसांनी पकडल्यावर त्याच्या अंगात फक्त पॅन्ट होता व अंतर्वस्त्र गायब होते.