शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बसचालकांवर होणार कारवाई

By admin | Updated: May 21, 2017 00:11 IST

मध्यप्रदेशातील ‘खासगी बसेसचा शहरात मुक्काम’ या शीर्षकाखाली "लोकमत"मध्ये वृत्त प्रकाशित होताच....

अवैध वाहतूक : अन्यथा बसेस पोलीस ठाण्यात जमा करावी लागेललोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मध्यप्रदेशातील ‘खासगी बसेसचा शहरात मुक्काम’ या शीर्षकाखाली "लोकमत"मध्ये वृत्त प्रकाशित होताच सर्व वाहन चालकांची शनिवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यात आली. त्यांनी महाराष्ट्राचा अधिकृत परवाना न दाखविल्याने त्यांना शेवटची वॉर्निंग देऊन सोडण्यात आले. मात्र, यानंतर ही वाहने महाराष्ट्राच्या हद्दीत सापडल्यास थेट जप्तीची कारवाई करण्याची तंबी देण्यात आल्याने वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे. "लोकमत"ने मध्यप्रदेशातील खासगी बसेसच्या धारणीतील अवैध फेऱ्यांबाबत सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ठाणेदार किशोर गवई यांनी मध्यप्रदेशातील वाहनांची कागदपत्रांची संपूर्ण तपासणी केली. त्यांचेकडे महाराष्ट्रात प्रवास करण्याची कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे उघड झाले. त्यामुळे शनिवारी आलेल्या ‘त्या’ अवैध खासगी बसेसच्या चालकांना यानंतर महाराष्ट्रात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. त्यानंतरही त्या वाहनांनी शहरात प्रवेश केल्यास थेट पोलीस ठाण्यात वाहने जमा करण्यात येणार असल्याची ताकिद त्यांना देण्यात आली आहे. "लोकमत"च्या दणक्याने झालेल्या या कार्यवाहीमुळे मध्यप्रदेश व कर्नाटक पासिंग काही खासगी बसेसच्या फेऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. अकोट मार्गावरील वाहनांचे काय ?मध्यप्रदेशाच्याच धर्तीवर महाराष्ट्रातीलच अनेक वाहने धारणी ते अकोट मार्गे धावत आहेत. या वाहनांकडेसुद्धा अधिकृत प्रवासी वाहतुकीच परवाना नसताना जीवघेण्या प्रवासाला घाटवळणावर सुरू आहे. पोलिसांनी याकडेसुद्धा लक्ष देण्याची मागणी जनता करीत आहे.