शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:12 IST

चांदूर रेल्वे : तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, तालुक्यातील प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक ...

चांदूर रेल्वे : तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, तालुक्यातील प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक दुकानदार व्यावसायिकांना कोविड चाचणी सक्तीची केली असून, २५ मार्चपर्यंत चाचणी न करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्या मार्गदर्शनात २२ मार्च रोजी झालेल्या बैठकीत तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी या सूचना दिल्या. चाचणी सुलभ व्हावी, यासाठी २४ मार्च रोजी दुपारी १ ते ४ पर्यंत व्यावसायिकांसाठी विशेष कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही तहसीलदारांनी सांगितले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी कोवे, महिला बाल विकास अधिकारी वैशाली ढगे, गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर उपस्थित होते.

तालुक्यात २१ मार्च रोजी २० कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यासोबत शहरातील कोरोना चाचणी वाढविण्याचे प्रयत्न प्रशासन करीत आहे. या शिबिरात कोणालाही चाचणी करून घेता येईल. ग्रामीण रुग्णालयात दररोज सकाळी ९ ते १२ या वेळात चाचणी सुरू असल्याचे आरोग्य अधिकारी कोवे यांनी सांगितले, तर २५ मार्चपर्यंत तालुक्यातील सर्व व्यावसायिकांनी कोविड चाचणी करून त्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवावे, असे आवाहन तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी केले. त्यानंतर सर्व दुकानांना भेट देऊन चाचणी प्रमाणपत्र तपासण्यात येणार असून, प्रमाणपत्र नसणाऱ्या दुकानावर नाइलाजाने दंडात्मक कारवाई करावी लागणार असल्याचेही सांगण्यात आले.