शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण फिरणाऱ्यांची आकस्मिक काेविड चाचणी, १० मिनिटांत अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:12 IST

महापालिकेचे राजापेठ, राजकमल चौक, इतवारा बाजारात रॅपिड ॲन्टिजेन तपासणी, ३३८ पैकी एक जण पॉझिटिव्ह अमरावती : संचारबंदी असताना विनाकारण ...

महापालिकेचे राजापेठ, राजकमल चौक, इतवारा बाजारात रॅपिड ॲन्टिजेन तपासणी, ३३८ पैकी एक जण पॉझिटिव्ह

अमरावती : संचारबंदी असताना विनाकारण बाहेर फिरणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची शुक्रवारी आकस्मिक कोविड चाचणी करण्यात आली. मोबाईल व्हॅनद्धारे राजापेठ, इतवारा बाजारात रॅपिड ॲन्टिजेन तपासणी करून १० मिनिटांतच नागरिकांना अहवाल देण्यात आला. महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला गेला. ३३८ व्यक्तींनी कोराना चाचणी केल्यानंतर एक जण पॉझिटिव्ह आढळून आला. दरम्यान जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देऊन कोविड चाचणीचा आढावा घेतला.

महापालिका आयुक्‍त प्रशांत रोडे यांच्‍या निर्देशानुसार अमरावती महापालिका व पोलीस विभागाद्वारे संयुक्‍त कारवाई करून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड ॲन्‍टिजन टेस्‍ट करण्‍यात आली. कोरोना तपासणी वाहन चौका-चौकांत उभे करून कोरोना तपासणीचे आवाहन महापालिकेच्‍यावतीने ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना करण्यात आले. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा इशाराही यावेळी देण्‍यात आला. व्‍यापारी व नागरिकांची कोविड चाचणी महापालिकेच्‍यावतीने ही तपासणी मोहीम राबविली जात असल्‍याचे उपायुक्‍त रवि पवार यांनी सांगितले. मास्‍क न लावणे, शारीरिक अंतराचे पालन न करणे, जास्‍त प्रवासी असलेल्‍या वाहनांवर यावेळी कारवाई करण्‍यात आली. यावेळी फुटपाथवरील विक्रेते, ऑटोरिक्षा चालक, अत्‍यावश्‍यक सेवा कर्मचारी व इतर वाहनचालकांची कोरोना तपासणी करण्‍यात आली. ऑटोरिक्षातील प्रवाशांची कोरोना तपासणी करण्‍यात आली. यावेळी उपायुक्‍त रवि पवार, राजापेठचे वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, सहायक आयुक्‍त नरेंद्र वानखडे, संदीप पाटबागे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, स्‍वास्‍थ्य निरीक्षक विजय बुरे, स्‍वास्‍थ्य निरीक्षक मनीष हडाले, प्रीती दाभाडे, राजापेठ येथील पोलीस कर्मचारी उपस्थित होते. राजापेठ येथे १०७, राजकमल चौकात ९१, तर इतवारा बाजारात १४० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली.