अभाविपचा अमरावती विद्यापीठावर विशाल मोर्चा; विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:56 IST2025-11-15T14:51:42+5:302025-11-15T14:56:31+5:30
Amravati : गाडगेनगर ते विद्यापीठ पायदळ वारी; प्रवेश, परीक्षा, पाठ्यक्रमावर वेधले लक्ष

ABVP holds massive march on Amravati University; Students raise issues
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रश्नांसह विद्यापीठातील प्रवेश, परिणाम, पाठ्यक्रम, पदभरती व छात्रसंघ निवडणुका यांसारख्या विविध शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विशाल मोर्चा काढला. संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठावर धडक देत कुलगुरूंना निवेदन सादर करीत विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.
विदर्भ प्रदेश मंत्री पायल किनाके यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने विविध ३४ मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांना सादर केले. या मोर्चाचे सूत्र संचालन अमरावती महानगर मंत्री रिद्देश देशमुख यांनी केले.
यावेळी अमरावती विभाग संयोजक ऋषभ गोहणे, अमरावती महानगर सहमंत्री गौरी भारती, अचलपूर जिल्हा संयोजक ओम धोटे, चंद्रकांत बोबडे, प्रगती वानखेडे, ऋषिकेश मानवटकर, अंशीत वर्मा यांच्यासह अमरावती विद्यापीठातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, यवतमाळ जिल्ह्यामधून सुमारे हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.