शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

अबब! किती ही भाडेवाढ?

By admin | Updated: August 26, 2014 23:02 IST

महागाई गगनाला भिडली आहे. वाढत्या महागाईसोबतच लोकांचे उत्पन्न आणि जीवनस्तरही उंचावला आहे. सर्वस्तरातील नागरिकांच्या उत्पन्नात झालेली वाढ सुखावह असली तरी अमर्याद गरजांच्या

ना नियम, ना बंधन : १०० ते २०० टक्के वाढ, सामान्यांचे बिघडले बजेट!इंदल चव्हाण - अमरावतीमहागाई गगनाला भिडली आहे. वाढत्या महागाईसोबतच लोकांचे उत्पन्न आणि जीवनस्तरही उंचावला आहे. सर्वस्तरातील नागरिकांच्या उत्पन्नात झालेली वाढ सुखावह असली तरी अमर्याद गरजांच्या तुलनेत वाढते उत्पन्नही अपुरे पडत आहे. दैनंदिन अत्यावश्यक गरजांमध्ये अलीकडे घरभाड्यांचा समावेश केला जाऊ लागला आहे. चार वर्षांची आकडेवारी पाहता दरडोई उत्पन्नात सरासरी २५ ते ५० टक्क्यांनी वाढ झाली असून घरभाड्यांमध्ये मात्र १०० ते २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही भाडेवाढ अर्थशास्त्राच्या नियमांना छेद देणारी आहे. त्यामुळे भाडेकरूंच्या आर्थिक अडचणीत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. नोकरीनिमित्त शहरात आलेल्या कुटुंबांना निवासाची व्यवस्था करताना घरभाडेवाढीचा ताण सहन करावा लागत आहे. सन २०१० मध्ये १० हजार रुपये मासिक मिळकत असलेल्या व्यक्तींना ३ हजार रुपयांत २ बेडरुमचा फ्लॅट उपलब्ध होणे शक्य होते. आता त्या व्यक्तिची मासिक मिळकत १५ हजार रुपये झाल्याचे गृहीत धरली तरी त्याच फ्लॅटचे भाडे मात्र ८ ते १० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे भाडेकरूंच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. शहरात निवासाची दुसरी योग्य सोय नसल्याने मागेल ते भाडे देणे असा नाईलाज बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांचा झाला आहे. सन २०१० मध्ये ज्या खोलीचे भाडे ८०० रुपये होते त्याच खोलीचे भाडे आता २००० रुपयांवर पोहोचले आहे. प्रचंड भाडेवाढीमुळे मध्यमवर्गीयांसह सर्वच स्तरातील नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. अमरावती शहरात वीज कंपनीचे कर्मचारी वास्तव्यास आल्यानंतर अचानक भाडेवाढ सुरू झाली. वीज कंपनीमुळे सुरू झालेला हा प्रकार त्यानंतर प्रघात झाला. उत्तम भाडे मिळत असल्यामुळे अमरावतीकरांनी गृहनिर्मितीत पैसा गुंतविला. घराची किंमतही वाढते आणि भाड्याच्या मिळकतीवर गृहकर्जाची परतफेड करता येते, असा दुहेरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामान्य अमरावतीकरांनी भाड्यासाठीच्या गृहखरेदीला प्राधान्य दिले. 'रेन्टल हाऊस कंसल्टंसी' चालविणाऱ्यांचाही व्यवसाय त्यामुळे बहरला.ंभाडेवाढीची कारणेशहराचा विस्तार झाला तरी त्याला मर्यादा आहेत; पण बाहेरून अनेक कारणांनी शहरात येणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी फ्लॅट सिस्टीम उभ्या राहात आहेत. काही ठिकाणी घरे भाडयाने दिली जातात; तरीही निवासाची गरज भागत नाही. त्यामुळे उपलब्ध घरांच्या मालकांनी घरे भाड्याने देऊन उत्पन्नाचा नवा स्त्रोतच निर्माण केला आहे. परिसरनिहाय घरभाडे आकारण्याची पध्दतही अंमलात आणली जात आहे.