१८ वर्षीय तरूणीचे अपहरण; नागपूर, शेगावात नेऊन केले अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 21:41 IST2022-12-10T21:14:21+5:302022-12-10T21:41:56+5:30

पीडितेच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Abduction of 18 year old girl Taken to Nagpur Shegaon nd physically assaulted | १८ वर्षीय तरूणीचे अपहरण; नागपूर, शेगावात नेऊन केले अत्याचार

१८ वर्षीय तरूणीचे अपहरण; नागपूर, शेगावात नेऊन केले अत्याचार

अमरावती :  एका १८ वर्षीय तरूणीचे अपहरण करून तिचेवर नागपूर, शेगावातील लॉजमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी आरोपी गणेश ढोके (४२, जुना धामणगाव) याच्याविरुद्ध अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 

तक्रारीनुसार, पीडिता व आरोपी यांच्यात जुनी ओळख आहे.  दरम्यान, शुभम वानखडे हा पीडितेला त्रास देत असल्याने तिने गणेश याची मदत घेतली. त्याला समजावून सांगण्याची विनंती केली असता गणेशने त्यास समजविले. त्यानंतर शुभम वानखडे याने त्रास दिला नाही.

दरम्यान, ७ डिसेंबर रोजी दुपारी त्याने तिच्याशी संवाद साधला. शुभम वानखडेबद्दल बोलू असे म्हणून गणेश हा पीडीतेला दुचाकीवर बसवून नागपूर येथे घेऊन गेला. तेथे लॉजवर थांबून तिचेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. तेथून पुलगाव येथे येऊन तिला तो शेगावला घेऊन गेला. तेथील लॉजवर नेऊन त्याने तिला लग्नाचे आमिष दिले. अन्‌ पुन्हा तिच्यावर अत्याचार केले. ७ डिसेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत तो घटनाक्रम घडला

Web Title: Abduction of 18 year old girl Taken to Nagpur Shegaon nd physically assaulted