शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

अपहृत अल्पवयीन मुलगी लोणी टाकळीत सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 5:00 AM

पोलीस सूत्रानुसार, मुंबईच्या मुलुंड भागातील एक कुटुंब मिळेल त्या वाहनाने, तर कधी पायी अकोला येथे येण्यास निघाले होते. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मजुरी करणाऱ्या या कुटुंबातील १७ वर्षाचा मुलगा व १३ वर्षाची मुलगी यांना एका व्यक्तीने दुचाकीवर बसविले. उन्ह अधिक असल्यामुळे कुटुंबीयांनीदेखील होकार दिला. काही अंतरावर दुचाकीस्वाराने मुलाला उतरविले.

ठळक मुद्देवाशिमचा आरोपी पसार : मुंबईहून निघाले होते कुटुंब

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : मुंबईहून कुटुंबासोबत अकोल्याकडे पायी येत असताना जळगावमध्ये अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी अमरावती-अकोला महामार्गावरील लोणी टाकळीनजीक सापडली. यात आरोपी पसार झाला असून, अल्पवयीन मुलीला जळगाव पोलीस घेऊन गेले आहेत.पोलीस सूत्रानुसार, मुंबईच्या मुलुंड भागातील एक कुटुंब मिळेल त्या वाहनाने, तर कधी पायी अकोला येथे येण्यास निघाले होते. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मजुरी करणाऱ्या या कुटुंबातील १७ वर्षाचा मुलगा व १३ वर्षाची मुलगी यांना एका व्यक्तीने दुचाकीवर बसविले. उन्ह अधिक असल्यामुळे कुटुंबीयांनीदेखील होकार दिला. काही अंतरावर दुचाकीस्वाराने मुलाला उतरविले. पुढे पोलीस असल्याने तू चालत ये, असे तो म्हणाला. मात्र, बरेच अंतर गाठल्यानंतरही बहीण व लिफ्ट देणारा युवक दिसत नसल्याने ही सर्व घटना मुलाने आई-वडिलांना सांगितली. त्यांनी तात्काळ नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली.दरम्यान, सदर मुलगी महामार्गावरील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर फिरताना दिसली. या मुलीला लोणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणातील आरोपी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील आहे. गणेश सखाराम बांगर (३२) असे त्याचे नाव आहे. या मुलीला जळगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एन.के. भोई यांनी दिली.लोणी पोलीस पसार असलेल्या आरोपीचा कसून शोध घेत आहेत. त्याकरिता विशेष चमू गठित करण्यात आली. वाशिम पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी