शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

९ लाख ४९ हजार मतदारांचीच आधार नोंदणी

By admin | Updated: June 25, 2015 00:12 IST

राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रमाला जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी सुरुवात झाली आहे. मात्र, या मोहिमेला सर्वत्र अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागात माहितीच नाही : नोंदणीला अल्प प्रतिसादअमरावती : राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रमाला जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी सुरुवात झाली आहे. मात्र, या मोहिमेला सर्वत्र अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील २२ लाख ४९ हजार १११ एकूण मतदारांपैकी आतापर्यंत केवळ १ लाख ४९ हजार १२ एवढ्या मतदारांनी आधार क्रमांकाची माहिती बीएलओकडे जमा केली आहे. आधार क्रमांकाची माहिती जमा करणाऱ्या बीएलओकडे तसेच आॅनलाईन मतदारांचे आधार क्रमांक आणि मतदार ओळखपत्रांची सांगड घालण्याचे काम प्रशासनाने पूर्ण केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार गेल्या महिनाभरापूर्वी मतदार याद्या प्रमाणिकरणाच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. या मोहिमेनुसार आठवड्यातील दोन दिवस टप्प्याटप्प्याने मतदारांची माहिती संकलित केली जात आहे. मात्र. सूचीचा कालावधी आणि आता पेरणीची लगबग सुरु असल्याने या मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. वितरण प्रणालीतील दोष दूर करण्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे. मात्र, याची माहिती ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचत नसल्यामुळेही यात अडचणी येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदार याद्या आधार नोंदणी मोहिमेला अतिशय थंड प्रतिसाद मिळत आहे. मोहिमेचा उद्देशमतदार यादीतील मतदारांची नावे आणि त्यांचा आधार क्रमांक याची सांगड घालणे, यादीतील दुबार नावे वगळणे, स्थलांतरित मतदारांची नावे यादीतून बाद करणे व ओळखपत्रातील चुका दुरुस्त करणे. २१ जूनचा मुहूर्त टळलामतदार याद्या प्रमाणिकरणासाठी १७ मे नंतर २१ जूनचा मुहूर्त काढला होता. मात्र, २१ जूनची मोहीम रद्द करुन ती आता २८ जून रोजी जिल्हाभरात राबविली जाणार आहे.