तरुणाचा ट्रॅक्टर चालवताना विचित्र असा अपघात, तोल जाऊन आला चाकात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 11:28 IST2023-05-31T11:27:24+5:302023-05-31T11:28:01+5:30
जागीच मृत्यू : ट्रॅक्टर समोर असलेल्या झाडावर जाऊन धडकले

तरुणाचा ट्रॅक्टर चालवताना विचित्र असा अपघात, तोल जाऊन आला चाकात
पथ्रोट (अमरावती) : पथ्रोटपासून काही अंतरावर रामपूर येथे खरीप हंगामाकरिता संत्रा नांगरणी सुरू असताना अचानक फांदी मध्ये आल्याने ट्रॅक्टरवरून तोल गेला. खाली पडून त्याच्या अंगावरून चाक गेल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ३०) ला घडली.
पथ्रोट येथील ज्ञानेश्वर नागपुरे यांच्या शेतात महेश राजेंद्र लिल्हरे (वय ३४, मु. तेलांखडी, रामपूर) हा देवराव माहुले यांच्या मालकीचा ट्रॅक्टर घेऊन गेला होता. शेतात नांगरणी करत असताना त्याचा तोल गेला आणि तो पडून मागच्या चाकामध्ये येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आणि ट्रॅक्टर समोर असलेल्या झाडावर जाऊन धडकले व ते संत्रा झाडही पडले. तत्काळ पथ्रोट पोलिस स्टेशनला माहिती मिळताच घटना स्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात अचलपूर येथे पाठविण्यात आले. उपस्थितांमध्ये झाडाची फांदी आडवी आली होती, ती बाजूला करताना तोल गेला तर थोडी डुलकी आली म्हणून तोल गेला अशी चर्चा सुरू होती.