भरधाव कारने घेतला उंटाचा जीव; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By प्रदीप भाकरे | Updated: November 26, 2023 13:16 IST2023-11-26T13:15:10+5:302023-11-26T13:16:07+5:30
कर्णाराम हा २० मेंढ्या व एक उंट घेऊन परतवाडा येथून पथ्रोट रोडने जात होता.

भरधाव कारने घेतला उंटाचा जीव; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावती : भरधाव कारने उंटाचा जीव घेतला. पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाल्मिकपूर गावादरम्यान २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी, कर्णाराम देवासी (२३,कंवला, राजस्थान) याच्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी शनिवारी रात्री एमएच ०१ बीएफ ७५११ या कारच्या चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा नोंदविला.
कर्णाराम हा २० मेंढ्या व एक उंट घेऊन परतवाडा येथून पथ्रोट रोडने जात होता. त्यावेळी भरधाव कारने उंटाला मागून धडक दिली. ती धडक इतकी जबरदस्त होती, की तो उंट जागीच गतप्राण झाला. त्यामुळे आपले सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद कर्णाराम याने पथ्रोेट पोलिसांत नोंदविली. चालकाने आपले वाहन अत्यंत बेदरकारपणे व हयगयीने चालविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.