शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"आपण कन्व्हर्टेड मुस्लीम आहोत," सांगणाऱ्या माथेफिरूला इंदूरमध्ये केले अटक; कॉल कारण्यामागचा उद्देश काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:36 IST

गुन्हे शाखेची कारवाई : लपवली होती ओळख, म्हणाला, नशेत केला धमकीचा कॉल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती पोलिस आयुक्तालय परिसरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा अखेर २४ तासांच्या आत इंदूरमध्ये पकडला गेला. रविवारी पहाटे शहर गुन्हे शाखेचे पथक आरोपीसह अमरावतीत पोहोचले. हरीश पांडुरंग घाडवे ऊर्फ सोहेल पांडुरंग शेख (३३, रा. रहाटगाव, अमरावती) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अमरावती शहर पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याची कबुली त्याने दिली. आपण ते कृत्य नशेत केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, फ्रेजरपुरा पोलिस विविध अंगाने त्याची चौकशी करीत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी रविवारी दिली.

शहर पोलिस आयुक्तालयातील कंट्रोल रूमच्या लैंडलाइन व एका मोबाइल क्रमांकावर २८ नोव्हेंबरला रात्री ८:२० च्या सुमारास अज्ञात कॉल आला. "आपण कन्व्हर्टेड मुस्लीम आहोत," असे सांगत त्याने आपली ओळख हरीश अशी करून दिली, तसेच पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे शिवीगाळही केली. याप्रकरणी कंट्रोल रूममधील एएसआय कमल लाडवीकर यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी २९ नोव्हेंबर रोजी पहाटे गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीने त्या कॉलरचे रहाटगाव येथील घर शोधत त्याची पार्श्वभूमी पोलिसांनी तपासली.

रात्रभर प्रवास करून शहरात

आरोपीचे लोकेशन मध्य प्रदेशातील इंदूर येथे आल्याने पोलिस उपायुक्त गणेश शिंदे व गुन्हे शाखा प्रमुख पीआय संदीप चव्हाण यांनी तातडीने इंदूर पोलिसांची मदत घेतली. तो तेथून पुढे पळून जाऊ नये, यासाठी इंदूर पोलिसांनी त्याला २८ ला सायंकाळी ताब्यात घेतले. गुन्हे शाखेतील अंमलदार फिरोजखान, सतीश देशमुख, नईम बेग, रंजीत गावंडे, प्रभात पोकळे यांची टीम शनिवारी मध्य प्रदेशातच अन्य गुन्ह्याच्या तपासासाठी तेथे होती. त्यांनी शनिवारी रात्रभर प्रवास करून आरोपी सोहेल पांडुरंग शेख याला अमरावतीत आणले. यानंतर त्याला फ्रेजरपुरा पोलिसांच्या सुपुर्द करण्यात आले. त्याला रविवारी न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indore: Man arrested for threatening Amravati police, claiming Muslim conversion.

Web Summary : A man threatening Amravati police with a bomb blast, claiming to be a converted Muslim, was arrested in Indore. He confessed to making the call while intoxicated. Motive under investigation.
टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी