अन् 'त्याने' मिळेल त्याच्या कानाखाली वाजवत धूम ठोकली, नागरिक भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 05:30 PM2022-03-12T17:30:33+5:302022-03-12T18:43:06+5:30

बाजारातील स्थिती सुरळीत सुरू असताना अचानक एका वेडसर युवकाने काही काळ फुटपाथवरील दुकानदार ऑटोचालक आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर तो सैरावैरा सुटल्याने तेथे दहशत पसरली होती. 

a madman slapped on people's face on market and run away | अन् 'त्याने' मिळेल त्याच्या कानाखाली वाजवत धूम ठोकली, नागरिक भयभीत

अन् 'त्याने' मिळेल त्याच्या कानाखाली वाजवत धूम ठोकली, नागरिक भयभीत

Next
ठळक मुद्देपरतवाड्यातील घटना

परतवाडा (अमरावती) : गुरुवारी दुपारी १२:३० वाजता दरम्यान शहरात आठवडी बाजार असल्याने मेळघाट व परिसरातून येणाऱ्या नागरिकांची रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. विश्रामगह, चिखलदरा स्टॉप परिसरात अचानक एक वेडसर युवक धावत आला. मिळेल त्याच्या कानाखाली वाजवत धूम ठोकली आणि नागरिक एकमेकांकडे बघत स्तब्ध झाले. काहींनी त्याचा माग काढला. पण, तो मिळेल त्या रस्त्याने पळत सुटला नि क्षणात बेपत्ता झाला.

गुरुवारी भरणाऱ्या परतवाडा शहरातील आठवडी बाजारात खरेदीसाठी चिखलदरा व धारणी मार्गाने आदिवासींनी एकच गर्दी केली होती. सकाळी १० वाजतानंतर मिळेल त्या वाहनाने मेळघाट व परिसरातील नागरिक बाजार करण्यासाठी शहरात आले. बाजारातील स्थिती सुरळीत सुरू असताना अचानक एका वेडसर युवकाने काही काळ फुटपाथवरील दुकानदार ऑटोचालक आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर तो सैरावैरा सुटल्याने तेथे दहशत पसरली होती. 

दोन-चार शेकल्या हो...

शहरातील संतोषनगर भागात राहणारे झेरॉक्स व्यावसायिक एका वृत्तपत्राचे वार्ताहरदेखील आहेत. गुरुवारी नेहमीप्रमाणे ते आपल्या दुकानात जाण्यासाठी निघाले. चिखलदरा स्टॉपपर्यंत आल्यावर अचानक आलेल्या त्या वेडसर युवकाने त्यांच्या कानाखाली  दोन-चार थापडा हाणल्या. अचानक झालेल्या हल्ल्याने डांगे कावरेबावरे झाले.

शहरात वेड्यांची संख्या वाढली

परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरांलगतच्या कांडली, देवमाळी भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रात्री कुलूपबंद दारे चोरटे फोडतात. दुसरीकडे रस्त्यांवर भिकारी आणि वेड्यांची संख्या वाढली आहे.

Web Title: a madman slapped on people's face on market and run away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.