शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

अस्मानी, सुलतानी संकटाचे १९ हजार बळी, धोरणात्मक निर्णय केव्हा घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2022 11:40 IST

आठ तासात एक शेतकरी आत्महत्या : संघर्षावर नैराश्य भारी, धक्कादायक वास्तव

गजानन मोहोड

अमरावती : दोन दशकांपासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबलेले नाही. या कालावधीत पश्चिम विदर्भात १८,५९५ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. दर आठ तासात एक शेतकरीमृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अस्मानी व सुलतानी संकटांचे हे शेतकरी बळी ठरले आहेत. बळीराजा संकटाच्या गर्तेत असतांना त्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी ठरत आहे.

शेतकरी आत्महत्यांची नोंद सन २००१ पासून प्रशासनाद्वारा घेतली जाते. त्यानुसार ऑक्टोबर २०२२ अखेरपर्यंत विभागात १८,५९५ शेतकरी आत्महत्या झाल्या असल्या तरी शासन मदत ८,५७६ शेतकरी परिवारांना मिळाली आहे. यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त ९,८२० प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. याशिवाय दहा महिन्यात १९९ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी मृत्यूनंतरही त्याच्या मागचा त्रास संपलेला नाही.

निसर्गाच्या लहरीपणामुळे अलीकडे सतत नापिकी होत आहे. योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळत नाही. सिंचनाचा अनुशेष वाढतोच आहे. कृषी निविष्ठांचे दर वाढत आहेत. कृषिपंपाच्या जोडण्या प्रलंबित आहेत. जिरायती शेती का परवडत नाही, याचाही शोध घेणे गरजेचे आहे.

शासन मदतीचे निकष १६ वर्षांपूर्वीचे

शेतकरी आत्महत्याप्रकरणी शासन मदतीचे निकष २३ जानेवारी २००६पासून बदललेले नाहीत. यामध्ये ३० हजार रोख व ७० हजार रुपये पोस्ट किंवा बँकेच्या मासिक प्राप्ती योजनेत मृत शेतकऱ्याच्या वारसाच्या नावे ठेवले जातात. प्रकरण मंजुरीसाठी कित्येक महिन्यांचा कालावधी लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

उत्पादन खर्च व उत्पन्नाचा मेळ जुळणार केव्हा?

बँकांचे व सावकारांचे कर्ज, कर्जवसुलीसाठी तगादा, नैसर्गिक आपत्ती, नापिकी, दुष्काळ, आजारपण आदी शेतकरी आत्महत्यांची प्रमुख कारणे आहेत. शेती परवडणारी नसल्याने उत्पादन खर्च व उत्पन्नाचा मेळ जुळत नाही. यामुळे मुला - मुलींचे शिक्षण, लग्न, उदरनिर्वाह कसा करावा, या कारणावरूनही मानसिकता खचत असल्याचेही समोर आले आहे.

२००१ पासून आलेख वाढताच

सन २००१मध्ये विभागात ४९ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. त्यानंतर २००२ (८०), २००३ (१३४), २००४ (४१९), २००५ (४१९), २००६ (१,२९५), २००७ (१,११९), २००८ (१,०६१), २००९ (९०५), २०१० (१,०५१), २०११ (८८६), २०१२ (८४२), २०१३ (७०५), २०१४ (८३०), २०१५ (१,१८४), २०१६ (१,१०३), २०१७ (१,०६६), २०१८ (१,१४६), २०१९ (१,०५५), २०२० (१,१३७), २०२१ (१,१७९) व ३१ ऑक्टोबरपर्यंत ९३० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीDeathमृत्यूVidarbhaविदर्भ