७० गावे तहानली; १२ टँकरने पाणीपुरवठा, ४४ खासगी विहिरींचे अधिग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:38 IST2025-04-19T15:37:32+5:302025-04-19T15:38:21+5:30

जलस्रोतांना कोरड, योजना ठरल्या कुचकामी : मेळघाटात वाढली तीव्रता

70 villages thirsty; 12 tankers supply water, 44 private wells acquired | ७० गावे तहानली; १२ टँकरने पाणीपुरवठा, ४४ खासगी विहिरींचे अधिग्रहण

70 villages thirsty; 12 tankers supply water, 44 private wells acquired

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
एप्रिलमध्ये तापमान ४४ अंशांवर गेल्याने जलस्रोतांना कोरड पडली व पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. उंचावरील दुर्गम भाग असलेल्या मेळघाटात दाहकता वाढली आहे. सद्यःस्थितीत तहानलेल्या १२ गावांत टँकरने पाणीपुरवठा होत आहे. शिवाय ५७ गावांमध्ये २३ विंधनविहिरी व ४४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. मार्चअखेर जिल्ह्याचा पारा ४१ अंशांवर व एप्रिल महिन्यात ४३ अंशांचे पार गेला. त्यामुळे भूजल पातळीत कमी आली व पाण्याचे उद्भव कोरडे पडायला लागले व पाणीटंचाईची चटके जिल्ह्यात जाणवायला लागले आहे.


जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार चिखलदरा तालुक्यातील कोरडा, चुनखडी, आकी, खडीमल, मोथा, लवादा व तारुबांदा धारणी तालुक्यात कढाव, दाबका, रणीगाव, कंजोली, धारणमहू, दिदब्बा व बारू, अमरावती तालुक्यात कस्तुरा, मोगरा, अमडापूर व भानखेडा, मोर्शी तालुक्यात ब्राह्मणवाडा, पिंपळखुटा लहान, गोराळा, शिरजगाव व कोळविहीर, भातकुली तालुक्यात दाढीपेढी, चांदूर रेल्वे तालुक्यात सावंगी, मग्रापूर, टेंभुर्णी, निमला व पाथरगाव, तिवसा तालुक्यात अमदाबाद, फत्तेपूर, जावरा, वठोडा खुर्द, मार्डी व धोत्रा तालुक्यात अधिग्रहणातील विंधनविहीर व खासगी विहिरीद्वारे सद्यस्थितीत पाणीपुरवठा होत आहे.


या गावांमध्ये वाढली पाणीटंचाईची तीव्रता
नांदगाव तालुक्यात वाढोणा रामनाथ, खानापूर, हिवरा बु., मंगरूळ चव्हाळा, पळसमंडळ, खेडपिंप्री, वेळी गणेशपूर, लेहगाव, कंझरा, वाटपूर, शिवरा, टाकळी गिलबा, धर्मापूर, राजना व काजना तसेच अचलपूर तालुक्यात बोर्डा, परसापूर, काकडा व सर्फापूर तसेच वरुड तालुक्यात पोरगव्हाण व करजगाव येथे अधिग्रहणातील विंधन विहीर व खासगी विहिरींद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.


या गावांत टँकर सुरु
सद्यःस्थितीत चिखलदरा तालुक्यात आकी येथे येथे १, खडीमलला ४, मोथा २, लवादा (शहापूर) २, तारूबांदा २ व चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंग्री मग्रापूर येथे एक अशा १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. 


जिल्हास्थिती

  • खासगी टँकर सुरू आहे. यामध्ये ११ टैंकर मेळघाटात आहेत.
  • खासगी विंधन विहिरींचे अधिग्रहण करुन सद्यस्थितीत पाणीपुरवठा होत आहे
  • खासगी विहिरींचे अधिग्रहण करुन गावांना दिलासा देण्याचा प्रयत्न


या गावांमध्ये आतापासून पाणीटंचाईचे चटके
नांदगाव तालुक्यात वाढोणा रामनाथ, खानापूर, हिवरा बु., मंगरूळ चव्हाळा, पळसमंडळ, खेडपिंप्री, वेळी गणेशपूर, लेहगाव, कंझरा, वाटपूर, शिवरा, टाकळी गिलबा, धर्मापूर, राजना व काजना तसेच अचलपूर तालुक्यात बोर्डा, परसापूर, काकडा व सर्फापूर तसेच वरुड तालुक्यात पोरगव्हाण व करजगाव येथे अधिग्रहणातील विंधनविहीर व खासगी विहिरींद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

Web Title: 70 villages thirsty; 12 tankers supply water, 44 private wells acquired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.