शेतकऱ्यांच्या खात्यात आज होणार ५६ कोटी जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 11:48 IST2025-02-24T11:47:58+5:302025-02-24T11:48:41+5:30

Amravati : पीएम किसान योजनेंतर्गत २.८२ लाख शेतकऱ्यांना १९वा हप्ता मिळणार

56 crores will be deposited in farmers' accounts today | शेतकऱ्यांच्या खात्यात आज होणार ५६ कोटी जमा

56 crores will be deposited in farmers' accounts today

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
पीएम किसान योजनेंतर्गत २,८२,७०२ शेतकऱ्यांना १९वा हप्ता देण्यात येणार आहे व याद्वारे ५६.५४ कोटींचा लाभ बँक खात्यात जमा होणार असल्याने दिलासा मिळाला आहे. योजनेमध्ये ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच दोन हजार रुपयांचा लाभमिळणार आहे. मात्र, यासोबतच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता मिळणार नाही, त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.


लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी या दोन्ही योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. आता डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या दरम्यान पीएम किसान योजनेचा १९वा हप्ता २४ फेब्रुवारीला पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. बिहार राज्यातील भागलपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेचा १९वा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी दोन हजाराचा हप्ता जमा होत आहे. १२ हजार शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनेद्वारे प्रत्येक वर्षी लाभ मिळत आहे.


ई-केवायसी केलेले तालुकानिहाय शेतकरी
अचलपूर - २३२३९, अमरावती -१६८०७, अंजनगाव सुर्जी - १९,८१०, भातकुली - १६५२८, चांदूर रेल्वे -१४२२१, चांदूर बाजार - २७३३४, चिखलदरा ११४२२, दर्यापूर - २४९२१, धामणगाव - १८६०९, धारणी - १८०१९, मोर्शी - २५,६२०, नांदगाव खंडेश्वर -२३३३१, तिवसा - १५५८३, वरूड -२७२५८ शेतकरी

Web Title: 56 crores will be deposited in farmers' accounts today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.