राज्यात वनक्षेत्रातील आगीचा भडका;दोन वर्षांत ५४ हजार हेक्टर क्षेत्र खाक
By गणेश वासनिक | Updated: December 28, 2024 09:17 IST2024-12-28T09:17:38+5:302024-12-28T09:17:58+5:30
एकूण ५४ हजार हेक्टर वनक्षेत्र या दोन वर्षांत जळाल्याची नोंद आहे.

राज्यात वनक्षेत्रातील आगीचा भडका;दोन वर्षांत ५४ हजार हेक्टर क्षेत्र खाक
अमरावती : राज्यातील वनक्षेत्राला दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात आगी लागल्यामुळे वन्यजीव, वनांची मोठी हानी झाली आहे. सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, राज्यात १६ टक्के वनक्षेत्राची नोंद आहे. दरवर्षी उन्हाळ्यात वनक्षेत्रातील आगी लागतात. त्याची कागदोपत्री नोंद झाल्यावर पुढे कृती होताना दिसून येत नाही. २०२२ ते २०२४ या कालावधीत जलद आगीमुळे २ टक्के वनक्षेत्र जळाले. गंभीर आगीमध्ये १२.५७ टक्के वनक्षेत्र राख झाले. एकूण ५४ हजार हेक्टर वनक्षेत्र या दोन वर्षांत जळाल्याची नोंद आहे.
राज्यात जंगलांना आगी लागू नये, यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील. सचिव स्तरावर आढावा घेऊन आगीसंदर्भात गत दोन वर्षांत वन विभागाने केलेली कृती तपासली जाईल. तसेच आगीवर नियंत्रणासाठी अद्ययावत यंत्रसामग्रीचा वापर केला जाईल - गणेश नाईक, वनमंत्री