50 वर्षीय महिलेचा बलात्कार करून खून, पथ्रोट येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 11:47 IST2022-11-26T11:46:50+5:302022-11-26T11:47:01+5:30

अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलीस स्टेशन अंतर्गत 50 वर्षीय एका असहाय्य महिलेवर बलात्कार करून 30 वर्षीय युवकाने तिचा खून केल्याची घटना

50-year-old woman raped and murdered, incident at Pathrot | 50 वर्षीय महिलेचा बलात्कार करून खून, पथ्रोट येथील घटना

50 वर्षीय महिलेचा बलात्कार करून खून, पथ्रोट येथील घटना

अनिल कडू 
परतवाडा (अमरावती):-

अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलीस स्टेशन अंतर्गत 50 वर्षीय एका असहाय्य महिलेवर बलात्कार करून 30 वर्षीय युवकाने तिचा खून केल्याची घटना शुक्रवारला पथ्रोट येथे घडली. दुपारी चार वाजताच्यादरम्यान घडलेली ही घटना रात्री साडेआठ वाजता उजेडात आली.

यात आरोपी विशाल तांबटकर (30) रा.पथ्रोट यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पथ्रोट पोलीस करीत आहेत.

Web Title: 50-year-old woman raped and murdered, incident at Pathrot