शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

५० गद्दारांनी राज्यातील चांगले सरकार पाडले; आमदार देवेंद भुयार यांची बोचरी टीका

By गणेश वासनिक | Published: October 21, 2022 6:35 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदार संघातील निधी रोखला

अमरावती : राज्याचे ५० गद्दार गुजरातमार्गे गुवाहाटीला गेले आणि चांगले सरकार पाडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘अलिबाबा और चालीस चाेर’ असा उल्लेख करून आमचा कोट्यवधीचा निधी रोखला, अशी टीका वरूड-मोर्शीचेआमदार देवेंद्र भुयार यांनी येथे केली.

वरूड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या सत्कारप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आमदार भुयार यांनी निधी रोखल्याबाबत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

मी भाजपमध्ये जाणार, अशी जाणीवपूर्वक काही लोक माझी बदनामी करीत आहेत. मला भाजपमध्ये जायचे होते, तेव्हाच गेलो असतो. गुवाहाटीमध्ये मौजमजा केली असती आणि ५० खोके घेऊन आलो असतो, असा टोलाही त्यांनी लगावला. मी विराचाराने पक्का आहे, किंबहुना मी गुवाहटीला गेलो असतो तर या लोकांनी शेण घातलं असतं, असेही आमदार भुयार म्हणाले.

त्यावेळी मला जळगावमधून फोन येत होते, गुवाहाटीला ये नाही तर नागपूरला ये, असा निरोप देत होते. परंतु, मी हर्षवर्धन देशमुख यांचा कार्यकर्ता आहे. गद्दारी माझ्या रक्तात नाही. माझ्या लग्नात फडणवीस आले. त्यांची माझी रास एक आहे. ते लग्नाला आले म्हणजे मी भाजपमध्ये गेलो, असे होत नाही. पण, विरोधकांनी त्याचेही भांडवल केले. विरोधक बदनाम करायची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, मी घाबरत नाही. राजकारण हा माझा पिंड नाही. वडिलोपार्जित शेती असून, ती कसणार, अशी कबुली त्यांनी दिली.मुंबईत ठाकरेंची दहशत आहेच

मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज आहे आणि उद्याही राहील, हे कोणीही नाकारू शकत नाही, असेही आमदार देवेंद्र भुयार म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात चांगले काम केले. म्हणून जागतिक पातळीवर त्यांची दखल घेण्यात आली. परंतु, सत्तेसाठी काही गद्दारांनी ठाकरेंना धोका दिला. आता येत्या काळात मतदार त्यांना जागा दाखवून देतील. अंधेरी पूर्व मतदार संघातून ही सुरुवात झाली असून, ती राज्यभर पसरणार, असा विश्वास आमदार भुयार यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PoliticsराजकारणMLAआमदारmorshi-acमोर्शीEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे