लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दर्यापूर तालुका मुख्यालयाच्या नजीक बाभळी टी पॉईंटवर बुधवारी पोलिसांनी नाकेबंदी करून तब्बल ५० लाख रूपयांचा गुटखा जप्त केला. हा गुटखा राज्यात विविध ठिकाणी अवैधरीत्या विक्रसाठी जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.दर्यापूर पोलिसांना गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी तत्क्षण कारवाई करीत दर्यापूर-अंजनगाव मार्गावर नाकेबंदी करून तपासणीला प्रारंभ केला. दरम्यान गुडस गॅरेजचा ट्रक क्र मांक एचआर ३८ एस १२३६ हा बहिरममार्गे अकोला येथे जात होता. पोलिसांनी तपासणी केली असता त्यात गुटख्याची पोती आढळून आले. हा ट्रक दिल्लीहून आल्याची माहिती मिळाली आहे. या गुटख्याची बाजारात ५० लाखांहून अधिक किंमत असल्याची माहिती आहे. ट्रक जप्त करून दर्यापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. ट्रकमालक व माल कुणाचा याची माहिती पोलीस घेत आहे. ही कारवाई ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदशनाखाली शरद सारसे, उपपोलिस निरीक्षक रितेश राउत, बजरंग इंगळे, नीलेश गावंड यांनी कार्यवाही केली.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात ५० लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 13:58 IST
दर्यापूर तालुका मुख्यालयाच्या नजीक बाभळी टी पॉईंटवर बुधवारी पोलिसांनी नाकेबंदी करून तब्बल ५० लाख रूपयांचा गुटखा जप्त केला.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात ५० लाखांचा गुटखा जप्त
ठळक मुद्देपोलिसांची नाकेबंदी करून कारवाईट्रक भरून गुटखा