शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

५० बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा

By admin | Updated: May 22, 2015 00:38 IST

कुठलीही पदवी अथवा वैद्यकीय शिक्षण न घेता जिल्ह्यात जवळपास ५० बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने एकत्रित केली आहे.

अमरावती : कुठलीही पदवी अथवा वैद्यकीय शिक्षण न घेता जिल्ह्यात जवळपास ५० बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने एकत्रित केली आहे.या डॉक्टरांवर लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तालुकास्तरावर व ग्रामीण भागात अशा डॉक्टरांनी दुकाने थाटली आहेत. कोणालाही संशय येऊ नये म्हणून अशा बोगस डॉक्टरांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पदव्याही बोर्डावर लावल्या आहेत. अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी आरोग्य यंत्रणा व गृहविभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने या डॉक्टरांचे फावले आहे. जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बुधवारी वैद्यक पुनर्विलोकन समितीच्या सभेत दिले.

परप्रांतीय बोगस डॉक्टर अधिक फ्लाश गुलाल मंडळ शिंदखेड, पिजूस चिंतरंजन रॉय आसेगाव आणि संटू जगिंदरनाथ विश्वास मोर्शी या नियमबाह्यरित्या वैद्यकीय व्यवसाय करण्याचा भोंदू डॉक्टरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे तिघेही डॉक्टर परप्रांतीय आहेत. जिल्ह्यात ४० ते ५० बोगस डॉक्टरांची यादी तयार करण्यात असून त्यावर तालुकानिहाय कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. वैद्यक पुनर्विलोकन समितीची पुढील सभा २६ मे रोजी होणार आहे. त्यानंतर आणखी काही बोगस डॉक्टरांवर कारवाईचे संकेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.