शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

पाच ग्रा.पं.ची निवडणूक घोषित

By admin | Published: March 13, 2016 12:05 AM

जिल्ह्यात मे ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या पाच ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ७९ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्यपदाची निवडणूक ....

आचारसंहिता लागू : १७ ला मतदान, १८ एप्रिल रोजी मतमोजणीअमरावती : जिल्ह्यात मे ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या पाच ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ७९ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्यपदाची निवडणूक आयोगाने शुक्रवारी उशिरा जाहीर केली. या निवडणुकांसाठी १७ एप्रिल रोजी मतदान व १८ ला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी शुक्रवार १८ मार्चच्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू झाली आहे. अमरावती तालुक्यामधील रोहणखेड व उंबरखेड तसेच तिवसा तालुक्यामधील आखतवाडा, कवाडगव्हाण व घोटा या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व चिखलदरा तालुक्यामधील सोनापूर, टेंभूरसोडा, हतरू, रुईपठार, चिंचखेड, रायपूर, माखला, खिरपानी, सोमठाना खुर्द, अढाव, आमझरी, काकदरी, तिवसा तालुक्यामधील सार्सी, अनकवाडी, दुर्गवाडा, मोर्शी तालुक्यातील वणी, गोराळा, बेलोना, शिरुर, मायवाडी, नशिरपूर, लिहिदा, भाईपूर, पोरगव्हाण, चिंचोली गवळी, मनीमपूर, चांदूरबाजार तालुक्यातील गोविंदपूर, कल्होडी, खरपी, मासोद, मिर्झापूर, तळणीपूर्णा, धानोरापूर्णा, चांदूररेल्वे तालुक्यांमधील कळमगाव, पाथरगाव आदी ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पदासाठी ही निवडणूक होत आहे. ३० दिवसांत खर्च सादर करणे बंधनकारकअमरावती : तालुक्यामधील बोरगाव धर्माळे, कुंड सर्जापूर, माहुली जहागीर, सावर्डी, काटआमला, वरूड तालुक्यामधील गणेशपूर, बेनोडा, धारणी तालुक्यामधील कुसमकोट, विरोटी, सावलीखेडा, रेहट्या, नांदुरी, खाऱ्याटेंभरू, चटवाबोळ, कुटंगा, सुसर्दा, कारादा, दादरा, हिराबंबई, काटकुंभ, अचलपूर तालुक्यातील निमदरी, बेलखेडा, पिंपळखुटा, भातकुली तालुक्यामधील बैलमारखेडा, मार्की, वातोडा, म्हैसपूर, कुमागड, धामणगाव रेल्वे तालुक्यामधील जळगाव, निंबोली, कळासी, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा शिक्रा, दर्यापूर तालुक्यातील घोडचंदी, घडा, जसापूर, सुरळी, चंद्रपूर, उमरी, पिंपळखुटा व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली खुर्द, चिंचोली बु., खोडगाव या ७९ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्यपदांसाठी ही निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतीसाठी संबंधित परिक्षेत्रात शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्जासह पूर्ण निवडणूक प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने राबविण्यात येणार आहे व उमेदवारांना जंगम मालमत्ता, दोषसिद्धीनंतर झालेली शिक्षा व शिक्षण इत्यादीबाबत घोषणापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हे घोषणापत्र घेण्याविषयी सूचना आयोगाने दिल्या आहेत. निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना व बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनासुद्धा दैनंदिन खर्चाचा हिशोब निवडणूक निकाल जाहिर झाल्याच्या ३० दिवसाचे आत दाखल करणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)