शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

अपघात विम्यात शेतकऱ्यांना ४४ लाख

By admin | Updated: March 18, 2015 00:23 IST

शासनाच्या कृषी विभागाद्वारा राबविल्या जाणाऱ्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेत

लोकमत विशेषगजानन मोहोड अमरावतीशासनाच्या कृषी विभागाद्वारा राबविल्या जाणाऱ्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेत सन २०१३-१४ मध्ये प्राप्त झालेल्या ७१ पैकी ४४ प्रकरणांत शेतकरी परिवाराला ४४ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. १० मार्च २०१५ अखेर २१ प्रकरणे विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत. कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्यावतीने शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात येते. या योजने अंतर्गत विमा काढणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातात दोन्ही डोळे निकामी झाल्यास किंवा एक डोळा, एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रूपयांची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळते. अमरावती विभागात कृषी विभागाचे अमरावती, मोर्शी व अचलपूर असे तीन उपविभाग आहेत. अमरावती उपविभागात अपघातग्रस्त ३६ प्रकरणे दाखल करण्यात आली यापैकी २४ प्रकरणे विमा कंपनीद्वारा मंजूर करण्यात आली. ४ प्रकरणे नामंजूर तर ८ प्रकरणे विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत, मोर्शी उपविभागात २६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे दाखल करण्यात आली. विमा कंपनीद्वारा १६ प्रकरणे मंजुर करण्यात आली. १ प्रस्ताव नाकारला, ९ प्रकरणे प्रलंबित असून २६ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.अचलपूर उपविभागात ९ अपघातग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे दाखल करण्यात आली. काय आहे शेतकरी जनता विमा योजना?शेती व्यवसाय करतांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वीज पडणे, शॉक लागणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. अनेकदा कायमस्वरुपी अपंगत्व येते त्या परीवाराला उदरनिर्वाहासाठी आर्र्थीक लाभ मिळावा यासाठी आॅगस्ट २००४ मध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू करण्यात आली, याच योजनेला २००९-१० मध्ये शेतकरी जनता अपघात विमा योजना असे नाव देण्यात आले आहे.