शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

२०७६ विद्यार्थ्यांना मिळणार खासगी शाळेत मोफत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST

अमरावती: आर्थिक व दुर्बल घटकातील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून जिल्ह्यातील खासगी नामांकित शाळेत प्रवेश देण्यात येणार ...

अमरावती: आर्थिक व दुर्बल घटकातील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून जिल्ह्यातील खासगी नामांकित शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २४४ शाळांची ऑनलाइन नोंदणी केली आहे. जिल्हाभरात २ हजार ७६ मुलांना प्रवेश मिळणार आहे. यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली असून, २१ मार्चपर्यत ती चालणार आहे.

आर्थिक व दुर्बल घटकातील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार नामांकित शाळेत २५ टक्के बालकांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. २०२०-२१ या शैक्षणिक सत्रासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी मागील आठवड्यापर्यंत शाळांचे ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशासाठीचे ऑनलाइन प्रवेश अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची लगबग सुरू झाली आहे.

बॉक्स

एकच निघणार सोडत

नव्या शैक्षणिक सत्राकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रियेसाठी तीन टप्पे ऐवजी एकाच टप्प्यात राज्य स्तरावर लॉटरी काढली जाणार आहे. या सोडतीत पात्र ठरलेल्या पाल्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दिलेल्या मुदतीत आरटीई अंतर्गत संबंधित पाल्याचे प्रवेश निश्चित न केल्यास पुढे रिक्त राहणाऱ्या जागांवर प्रतीक्षा यादीतील पाल्यांना प्रवेशाची संधी मिळू शकणार आहे.

बॉक्स

बॉक्स

जिल्ह्यातील उपलब्ध जागा

अचलपूर १७२, अमरावती २७४, अंजनगाव सुर्जी १०३,भातकुली ६५,चांदूर बाजार १०९,चिखलदरा ५,चांदूर रेल्वे ४६,दयार्पूर १३७,धारणी १८,धामणगाव रेल्वे ८५,मोशी १४९, नांदगाव खंडेश्र्वर ४७,तिवसा ५४,वरूड १५५,अमरावती महापालिका क्षेत्र ६५७ अशा २०७६ जागांवर आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत.