शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
5
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
6
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
7
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
8
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
9
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
10
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
11
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
12
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
13
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
14
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
15
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
16
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
17
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
18
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
19
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
Daily Top 2Weekly Top 5

२० दुकानदारांचे करारनामे

By admin | Updated: May 25, 2015 00:23 IST

पहिल्या टप्प्यात खत्री कॉम्प्लेक्समध्ये ८० रिक्त दुकानांचे परस्पर करारनामे करण्याचा प्रताप तत्कालीन बाजार...

अमरावती : पहिल्या टप्प्यात खत्री कॉम्प्लेक्समध्ये ८० रिक्त दुकानांचे परस्पर करारनामे करण्याचा प्रताप तत्कालीन बाजार परवाना अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर जयस्वाल यांनी येथील उपनिबंधक कार्यालयात स्वत: दुकानदारांना गाळे वाटपसंदर्भात करारनामे करुन दिले आहे. एका दुकानदारांकडून किमान १८ ते २० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे बोलले जात आहे. या संकुलाचा करारनामा सन २०१८ मध्ये संपुष्टात येत असला तरी जयस्वाल यांनी दुकानदारांना पुढील २५ वर्षांसाठी करारनामे करुन दिले आहेत. नेमके कोणत्या दुकानदारांना गाळे वाटप करण्यात आले, त्यांची यादी गोळा करण्यात येत आहे. या सर्व दुकानादारांना भेटून कोणी करारनामे करुन दिले? किती रक्कमेचा व्यवहार झाला? कागदपत्रे कोणती? याची शहानिशा करण्यात आली आहे. हा सर्व अहवाल बाजार व परवाना विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तयार केला असून तो सोमवार २५ मे रोजी उपायुक्त चंदन पाटील यांच्या पुढ्यात ठेवला जाणार आहे. खत्री कॉम्प्लेक्समध्ये २३७ गाळे निर्माण करण्यात आले आहे. त्यापैकी १८० गाळे यापूर्वीच वाटप करण्यात आले आहे. उर्वरित गाळे वाटपात झालेला गैरप्रकार शोधून काढणे हे चौकशी अधिकाऱ्यांपुढे आव्हान ठरणारे आहे. चौकशीच्या पहिल्या टप्प्यात २२ दुकानदारांना नव्याने परस्पर करारनामे करुन दिल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने काही कागदपत्रेदेखील हाती लागल्याची माहिती आहे. या संकुलाचा अवधी २०१८ मध्ये संपुष्टात येत असताना २०४० या सालापर्यंत परस्पर करारनामे करुन देण्याची हिंमत तत्कालीन बाजार व परवाना अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी केल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.आयुक्तांनी दिले फौजदारीचे आदेशआयुक्त चंद्रकांत गुडेवार हे १५ दिवसांच्या रजेवर गेले असले तरी त्यांनी खत्री कॉम्प्लेक्सप्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जाण्यापूर्वीच दिले आहे. त्यामुळे सोमवारी अहवाल येताच चौकशी अधिकारी उपायुक्त चंदन पाटील यांना शहर कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदवावी लागणार आहे. या कॉम्प्लेक्समध्ये कोणी बदमाशी केली हे फौजदारी दाखल झाल्यानंतरच कळेल, हे वास्तव आहे.नियमबाह्य करारनामे झाल्याचे सिद्धगत आठवड्यात महापालिका बाजार व परवाना विभागाच्या निरीक्षकांनी खत्री कॉम्प्लेक्समध्ये पाहणी केली असता नव्याने २० ते २२ दुकानदारांसोबत करारनामे झाल्याची कागदपत्रे आढळून आली आहेत. गाळ्यांचे करारनामे करण्यासाठी किती रुपयांच्या व्यवहार झाला हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.