शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

१३ लाख बारकोड उत्तरपत्रिका पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 01:42 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आॅनलाईन मूल्यांकनासाठी खरेदी करण्यात आलेल्या तब्बल १३ लाख उत्तरपत्रिका भांडार विभागात पडून आहेत. गत दोन वर्षांपासून या उत्तरपत्रिका तशाच असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देपैशांची उधळपट्टी : आॅनलाईन उत्तरपत्रिकांचा आॅफलाईनसाठी होणार वापर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ऑनलाईन मूल्यांकनासाठी खरेदी करण्यात आलेल्या तब्बल १३ लाख उत्तरपत्रिका भांडार विभागात पडून आहेत. गत दोन वर्षांपासून या उत्तरपत्रिका तशाच असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.विद्यापीठात परीक्षा विभागाचा ऑनलाइन कारभार सुरू झाल्यानंतर सन २०१७ मध्ये २० लाख बारकोड उत्तरपत्रिकांची खरेदी करण्यात आली होती. प्रतिउत्तरपत्रिका १४ रूपये याप्रमाणे २ कोटी ८० लाखांच्या बारकोड उत्तरपत्रिका मागविण्यात आल्या होत्या. सन २०१८-२०१९ या वर्षात परीक्षा ऑनलाइन प्रणालीने घेण्यात आल्यात. त्यामुळे पहिल्या वर्षी सात लाख बारकोड उत्तरपत्रिका ऑनलाइन परीक्षेसाठी वापरण्यात आल्या. मात्र, सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात आॅनलाईन परीक्षा व मूल्यांकन काही कारणास्तव गुंडाळण्यात आल्या आहेत. परिणाणी आता विद्यापीठाच्या भांडार विभागात १३ लाख बारकोड उत्तरपत्रिका तशाच पडून आहेत. या उत्तरपत्रिकांचे वापर न झाल्यास कालातंराने त्या निरूपयोगी तर ठरणार नाही, अशी चिंता भांडार विभागातील अधिकाऱ्यांना सतावू लागली आहे. एकाच वेळी २० लाख बारकोड उत्तरपत्रिका खरेदी करण्यामागे नेमके काय कारण होते, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. बारकोड उत्तरपत्रिकांचा वापर हा ऑनलाइन परीक्षांसाठीच वापर होते. ऑफलाइन परीक्षांसाठी साध्या स्वरूपाचा उत्तरपत्रिका वापरल्या जातात. साध्या उत्तरपत्रिका ७ रूपये तर बारकोड उत्तरपत्रिकांचे बाजारमूल्य हे १४ रुपये आहे. त्यामुळे परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांच्या पैशाचा चुराडा चालविल्याचे दिसून येते. बारकोड उत्तरपत्रिका निरुपयोगी ठरू नये, यासाठी आता या उत्तरपत्रिका ऑफलाइन परीक्षेसाठी वापरण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे.वर्षभराने सुरू होणार ऑनलाईन परीक्षाविद्यापीठात यंदा ऑनलाइन परीक्षा व मूल्यांकन प्रणालीला ब्रेक लावण्यात आला आहे. ऑनलाईन परीक्षेच्या एंड टू एंड कामांसाठी नव्याने एजन्सी शोधली जाणार आहे. निविदा प्रक्रिया, करारनामा आदी प्रशासकीय बाबी पूर्णत्वास येण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे. नव्याने शोधली जाणारी एजन्सीचे सॉफ्टवेअर आणि अद्यावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण असल्याविषयी भर दिला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :universityविद्यापीठEducationशिक्षण