शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरावर १६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: May 22, 2015 00:36 IST

जिल्हा परिषदेत बदल्यांचा मौसम सुरू झाला आहे. गुरुवार २१ मे रोजी मागील वर्षीच्याच परिपत्रकानुसार जिल्हा स्तरावरील १६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात.

अमरावती : जिल्हा परिषदेत बदल्यांचा मौसम सुरू झाला आहे. गुरुवार २१ मे रोजी मागील वर्षीच्याच परिपत्रकानुसार जिल्हा स्तरावरील १६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. यामध्ये प्रशासकीय, विनंती, आपसीच्या कारणावरुन बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशनाद्वारे या बदल्या करण्यात आल्या. मागील वर्षी १५ मे रोजी ग्रामविकास मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकानुसर या बदल्या करण्यात आल्या आहेत. पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च घटक असलेली मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेमधील बदल्यांचा मौसम म्हणून नेहमीच चर्चेचा व प्रसंगी वादाचा विषय ठरला आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी पहिल्याच दिवशी जिल्हा स्तरावर झालेल्या बदल्यांनाही गालबोट न लागता बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय बदलीसाठी किमान १० वर्षांचा तर विनंतीसाठी ५ वर्षांचा निकष लावण्यात आला आहे. जि.प. सभागृहात प्रोजेक्टरद्वारे बदल्यांबाबतचे चित्र स्पष्ट करण्यात आले. यावेळी सीईओ अनिल भंडारी, कृषी, पशुसंवर्धन आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे विभागप्रमुख आणि अध्यक्ष सतीश उईके, सभापती उपस्थित होते. गुरुवारी झालेल्या बदल्यांमध्ये प्रामुख्याने पशुसंवर्धन, कृषी आणि ग्रामीण पाणीपुरवठा या तीन विभागातील जिल्हास्तरीय बदल्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)