शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदलीसाठी ११ हजार शिक्षक इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST

पान ३ अमरावती : एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदलून जाण्यासाठी राज्यातील अंदाजित ११ हजार शिक्षक इच्छुक आहेत. कोरोनाकाळात आपल्या ...

पान ३

अमरावती : एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदलून जाण्यासाठी राज्यातील अंदाजित ११ हजार शिक्षक इच्छुक आहेत. कोरोनाकाळात आपल्या जिल्ह्यात जाणारे इच्छुक खूपच आहेत. आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये पारदर्शकता राहावी म्हणून आता ही प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र स्वॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.

नोकरीला लागताना सर्व प्रकारच्या अटी व शर्थी मान्य करून अनेकजण दुसऱ्या जिल्ह्यात सहशिक्षक पदावर रुजू झाले. पाच वर्षे एकाच जिल्ह्यात काम केल्यानंतर संबंधित शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरतो. दुसरीकडे, तो शिक्षक ज्या प्रवर्गातून त्या ठिकाणी रुजू झाला आहे, त्या प्रवर्गाची जागा रिक्त असल्यानंतर त्याला आंतरजिल्हा बदलीतून संधी दिली जाते. मात्र, अनेक शिक्षकांनी बदलीसाठी प्रयत्न करूनही त्यांना त्यांच्या जिल्ह्यात बदली मिळालेली नाही. दुसरीकडे, जिल्हांतर्गत बदल्या दरवर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून केल्या जात होत्या. मात्र, त्यामध्येही पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी काही शिक्षकांनी थेट ग्रामविकास विभागाकडे केल्या. त्यामुळे आता आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाइन नव्हे तर ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी एक स्वतंत्र स्वॉफ्टवेअर तयार केले आहे.