मध्यरात्री चालकाला डुलकी लागली अन् गेले ११ जीव; सर्व मृतक मध्य प्रदेशचे, अमरावतीत आलेले मजुरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 07:00 IST2022-11-05T06:59:30+5:302022-11-05T07:00:50+5:30

परतवाडा-बैतूल मार्गावर अपघात

11 people in a four-wheeler died in a horrific accident on the Patrwada-Baitul road. | मध्यरात्री चालकाला डुलकी लागली अन् गेले ११ जीव; सर्व मृतक मध्य प्रदेशचे, अमरावतीत आलेले मजुरीला

मध्यरात्री चालकाला डुलकी लागली अन् गेले ११ जीव; सर्व मृतक मध्य प्रदेशचे, अमरावतीत आलेले मजुरीला

परतवाडा (जि. अमरावती)/बैतूल (मध्य प्रदेश) : शेतीची कामे आटोपून परतणाऱ्या मजुरांच्या चारचाकी वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चारचाकीतील ११ जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता ही घटना घडली. 

परतवाडा-बैतुल या मार्गावरील झल्लार-बुधगावदरम्यान हा अपघात झाला. मृतांमध्ये एकाच परिवारातील पाच सदस्यांचा तसेच सहा पुरुष, तीन महिला व दोनच चिमुकल्यांचा समावेश आहे. मेळघाट व त्याच्या सीमारेषेवरील मध्यप्रदेशच्या आदिवासी पाड्यांमधून अनेक आदिवासी कुटुंबे विदर्भ, मराठवाड्यात शेतातील पीक कापणीसाठी दीड महिन्यापासून वास्तव्याला होते.

कामे आटोपत आल्याने ही कुटुंबे गावी जात होती. घटनास्थळी बैतूलचे जिल्हाधिकारी अमरबीर सिंह व पोलीस अधीक्षक सीमाला प्रसाद यांनी भेट दिली. अपघातावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. मृतकांच्या परिवाराला प्रत्येकी दोन लाखांची मदत देण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.

Web Title: 11 people in a four-wheeler died in a horrific accident on the Patrwada-Baitul road.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.