शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

अस्मानी, सुलतानी संकटाचे अमरावती विभागात १०२२ शेतकरी बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:48 PM

अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात यंदा नोव्हेंबर महिन्यापर्यंत अस्मानी व सुलतानी संकटामुळे १०२२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. दर सात तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भातील वास्तवदर सात तासांत एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोपामुळे खरीप हंगाम उद्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, अटी-शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी पडत आहे. अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात यंदा नोव्हेंबर महिन्यापर्यंत अस्मानी व सुलतानी संकटामुळे १०२२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. दर सात तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.दुष्काळ, नापिकी, यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, मुला-मुलींचे विवाह, शिक्षण आदी विवंचनेमुळे जगावे कसे? या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी शेतकऱ्याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी लाभापासून वंचित राहत आहे. दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात नोव्हेंबर २०१८ पर्यंत १५ हजार ७२३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये सात हजार ५७ प्रकरणे पात्र, आठ हजार ४७० अपात्र, तर १९६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुर्देवी आहे. २००१ मध्ये ५२ प्रकरणे होती. २०१६ मध्ये १२३५, तर गतवर्षी ११७६ शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली आहे. यंदा जानेवारी महिन्यात ९८, फेब्रुवारी ८४, मार्च ९६, एप्रिल ७८, मे ८४, जून ८६, जुलै ८९, आॅगष्ट १०६, सप्टेंबर १०४, आॅक्टोबर १०३ व नोव्हेंबर महिन्यात ८५ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.१७ वर्षांत १५,७२३ शेतकरी आत्महत्यागेल्या १७ वर्षांत विभागासह वर्धा जिल्ह्यात १५,७२३ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये अमरावती विभागात १४ हजार ०९२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३,५४५, अकोला २,२१५, यवतमाळ ४,१८२, बुलडाणा २,६६३, वाशिम १,४८७ व वर्धा जिल्ह्यात १,६३१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.वरवरचे उपचार नको, कायमस्वरूपी हवेतराज्यात शेतकरी आत्महत्याप्रवण असणाऱ्या १४ जिल्ह्यासाठी आघाडी सरकारने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास या मिशनला पूर्णपणे अपयश आले आहे. यावर कायमस्वरुपी उपाय होणे गरजेचे आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या