शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे १०० कोटी प्रलंबित, संस्थाचालकांचा तगादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 16:09 IST

अमरावती : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नसल्याची बाब त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा ठरू लागली आहे.

गणेश वासनिकअमरावती : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नसल्याची बाब त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा ठरू लागली आहे. अमरावती विभागातील शिष्यवृत्तीची सुमारे १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम शासनाकडे प्रलंबित आहे. संस्थाचालकांनी या रकमेसाठी समाजकल्याण विभागाकडे तगादा लावला आहे.ओबीसी, अनुसूचित जाती, व्हीजेएनटी, एसबीसी या संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्याकरिता केंद्र व राज्य शासनाचे अनुदान मिळते. मात्र, ११ जानेवारी २०१० रोजी राज्यात शिष्यवृत्तीत घोटाळा झाल्याप्रकरणी राज्यभरात शैक्षणिक संस्थांबाबत अनेक शिष्यवृत्ती गैरव्यवहाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे राज्यातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिष्यवृत्ती काढण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्यवृत्ती घोटाळ्याची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी एसआयटी गठीत केली. एसआयटीने चौकशीनंतर राज्य शासनाला अहवालदेखील सादर केला आहे. तथापि मुख्यमंत्र्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत पारदर्शकतेसाठी आॅनलाईन अर्ज अनिवार्य केले. राज्य शासनाने ई-शिष्यवृत्तीच्या इत्थंभूत कामांसाठी पुणे येथील मास्कटेक कंपनीसोबत ३० एप्रिल २०१६ रोजी अस्तित्वात असलेला करार रद्द केला. तरीसुद्धा सन २०१६-२०१७ पर्यंत लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. पुन्हा नव्याने सन २०१७-२०१८ या वर्षासाठी ई-शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, यासाठी महाडीबीटी अंतर्गत नागपूर येथील इनोव्हेव मेसर्स कंपनीला कंत्राट सोपविले गेले.इनोव्हेव मेसर्सने ई-शिष्यवृत्तीचे काम सुरू केले. दरम्यान, सदर कंपनीलाच शेतकरी कर्जमाफीचे आॅनलाइन अर्जाचे काम देण्यात आले. इनोव्हेव कंपनीने राज्यात डाटा गोळा करण्याचे काम केले नसल्याने शेतकरी आॅनलाईन कर्जमाफीत फार मोठा घोळ करून ठेवला आहे. त्यामुळे राज्य शासनाने कशाच्या आधारे या कंपनीला मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ई-शिष्यवृत्तीचे काम सोपविल, हा संशोधनाचा विषय आहे. ई-शिष्यवृत्तीची प्रक्रिया तांत्रिक कारणाने आणि शासनकर्त्यांच्या दुर्लक्षाने ठप्प पडल्याने याचा फटका मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बसत आहे. गतवर्षीच्या शिष्यवृत्ती रकमेबाबत राज्य शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. परंतु, आयुक्त समाजकल्याण, पुणे यांनी २८ आॅगस्ट २०१७ नुसार शिष्यवृत्तीचे देयके आॅनलाइन ऐवजी आॅफलाइन काढण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शिष्यवृत्ती वाटपात पुन्हा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.पुन्हा शिष्यवृत्तीचा आॅफलाइन कारभारई-शिष्यवृत्ती महाडीबीटीच्या तांत्रिक कात्रीत अडकली आहे. त्यामुळे पुन्हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी आॅफलाइन अर्ज मागविण्याचा निर्णय २१ नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने सन २०१०-२०११ ते २०१६ पर्यत प्रलंबित असलेली शिष्यवृत्तीची ६० टक्के रक्कम तदर्थ (अ‍ॅडव्हान्स) घेण्यात आली. परंतु समाज कल्याण विभागाच्या शासननिर्णय १ नोव्हेंबर २००३ नुसार शिष्यवृत्तीची तदर्थ रक्कम ही संस्थाचालक, महाविद्यालयांना शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी देण्याचे नमूद आहे. त्यामुळे शासनाने सन २०१० ते २०१६ पर्यंत प्रलंबित असलेली शिष्यवृत्तीची रक्कम १०० टक्के वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, जुनी शिष्यवृत्तीची रक्कम प्रलंबित असताना सन २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षात अमरावती विभागात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे त्यामुळे १०० कोटी रुपये केव्हा मिळतील, याबाबत साशंकता आहे.

टॅग्स :examपरीक्षाAmravatiअमरावती