शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार वीज जोडण्या प्रलंबित

By admin | Updated: May 15, 2016 00:10 IST

शेतीचे क्षेत्र सिंचित करण्यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी पावले उचलल्याचे आश्वासन दिले जात आहे.

महावितरणची धिमी गती : शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढअमरावती : शेतीचे क्षेत्र सिंचित करण्यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी पावले उचलल्याचे आश्वासन दिले जात आहे. परंतु प्रत्यक्षात सिंचित क्षेत्रासाठी वीज जोडणी मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतरही वर्षानुवर्षे वाट पहावी लागत आहे. मागील वर्षात वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्यांपैकी तब्बल १० हजार ७१२ शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहेत. दरवर्षी महावितरणकडून धीम्या गतीने होत असलेल्या वीज जोडणीमुळे यंदाही अर्जदार शेतकऱ्यांना वीजजोडणी मिळेल, याची शाश्वती नसल्याची स्थिती आहे. दुष्काळातही सिंचन सुविधा असतानाही कृषी पंपाकरिता वीज जोडणी मिळविण्यात येत असलेल्या अडचणींमुळे शेतकऱ्यांसमोर पीक वाचविण्याचे आवाहन उभे ठाकले आहे. महावितरण सकारात्मक धोरण ठेवत यासंदर्भातील अडसर दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी उत्पादकता वाढ व प्रयोगशीलता जपण्याचे आवाहन एकीकडे शासनाकडून होत असताना शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना मात्र दुसरीकडे खीळ घालण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. जिल्ह्यासह राज्यात ३१ मार्च २०१५ पर्यंत महावितरणकडे ३८ लाख १२ हजार ६९८ कृषीपंप ग्राहक आहेत. यापैकी मागील वर्षी एक लाख १० हजार ४६ कृषिपंपाला वीजजोडणी देण्यात आली. सुरक्षा अनामत भरून वीजजोडणीसाठी १ लाख ७३ हजार ७५२ अर्ज प्रलंबित आहेत. मात्र त्यानंतरही कृषिपंपांचा अनुरोष कायम असल्याने तो दूर करण्याची मागणी होत आहे. सध्या महावितरणच्या नियमानुसार तीन एचपीच्या वीज कनेक्शनच्या एक ते पाच खांबांसाठी पोल महावितरण पाच हजार १०० रुपये घेते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार आठ दिवसांत वीज कनेक्शन देणे बंधनकारक आहे. परंतु सध्या या सर्व गोष्टीला महावितरणकडून दुजोरा दिला असून वीजजोडणीसाठी शेतकऱ्यांचा महावितरणच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)