शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

०.३३ एफएसआयची मंजुरी

By admin | Updated: May 22, 2015 00:34 IST

शहरातील भुयारी गटार योजना, पाणीपुरवठा योजनांचे दोन टप्पे व राजापेठ उड्डाण पुलासाठी शासन निधी देणार आहे.

अमरावती : शहरातील भुयारी गटार योजना, पाणीपुरवठा योजनांचे दोन टप्पे व राजापेठ उड्डाण पुलासाठी शासन निधी देणार आहे. महापालिकेचा आर्थिक विकास होण्यासाठी ०.३३ एफएसआय प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये जेवढे पैसे जमा होईल तेवढाच निधी शासन देणार आहे. यासाठी भांडवली खर्चाचे खाते उघडण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अमरावतीचा ‘स्मार्ट सिटीमध्ये समावेशाची घोषणा योग्यवेळी केली जाणार असल्याचे त्यांनी सूचकपणे सांगितले. नांदगावपेठ येथील औद्योगिक वसाहतीत वस्त्रोद्योग उद्यानाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या टेक्सटाईल पार्कमध्ये सध्या सात उद्योगांची नोंदणी झाली आहे. यापैकी एका उद्योगातून उत्पादन सुरू झाले. दोन उद्योग प्रगतीपथावर आहेत. चार उद्योगांच्या कामांना सुरुवात झाली आहे. २७०० कोटी रुपयांची गुंतवणूक या उद्योगांमुळे झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जलयुक्त शिवारअंतर्गत पाण्याच्या साठ्याचे विकेंद्रीकरण करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे करायची आहेत. कामात पारदर्शीपणा आणण्यासाठी एमआरएसईचा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. याअंतर्गत कामांची स्थिती पाहता येथे राज्य शासनाचा कार्यक्रम हा आता जनतेचा कार्यक्रम बनला आहे. यामुळे प्रत्येक गाव जलस्वयंपूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. काय आहे एफएसआय ?मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम केल्यास त्यानंतर अतिरिक्त बांधकामास मान्यता मिळत नाही. परंतु एफएसआय लागू झाल्यानंतर आता मालमत्ताधारकांना रीतसर अर्ज करुन अतिरिक्त बांधकाम नियमित करुन घेता येईल. त्याकरिता निवासी, औद्योगिक वापरासाठी पाच तर वाणिज्य वापराकरिता ८० टक्के प्रिमीयम भरुन सदर बांधकाम नियमित करुन घेता येईल, असे महापालिका सहायक संचालक नगररचना अधिकारी सुरेंद्र कांबळे यांनी सांगितले.उद्योजकांना भूखंड वाटपनांदगाव पेठ येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये येणाऱ्या श्याम इंडोफेब, व्हीएचएम लिमिटेड, सियाराम सिल्क मिल, सूर्यलक्ष्मी कॉटन मील, बालेश्वर सिंथेटिक, प्रभूदयाल पॉलिस्टर, गोल्डन फायबर एलएलपी कंपनीना भूखंड वाटपाचे प्रमाणपत्र याप्रसंगी देण्यात आले.