कावड यात्रेत गेलेल्या ट्रॅक्टरमधून पडल्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 16:56 IST2018-09-03T16:55:02+5:302018-09-03T16:56:32+5:30

रिधोरा (अकोला) : गांधीग्राम येथे पालखी महोत्सवात सहभागी होण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर मधून पडल्याने रिधोरा येथील २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

Youth's death due to falling through the tractor | कावड यात्रेत गेलेल्या ट्रॅक्टरमधून पडल्याने युवकाचा मृत्यू

कावड यात्रेत गेलेल्या ट्रॅक्टरमधून पडल्याने युवकाचा मृत्यू

ठळक मुद्देअंबादास ढगे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.संदीप सोळंके हे ट्रॅक्टर चालवीत होते तर अंबादास त्यांच्या बाजूला बसला होता.

रिधोरा (अकोला) : गांधीग्राम येथे पालखी महोत्सवात सहभागी होण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर मधून पडल्याने रिधोरा येथील २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अंबादास ढगे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
शेवटच्या श्रावण सोमवारी कावड यात्रा काढण्यासाठी रिधोरा येथील वीस ते २५ युवक गांधीग्राम येथे पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी रविवारी रात्री ट्रॅक्टरने जात होते. ट्रॅक्टर मालक संदीप सोळंके हे ट्रॅक्टर चालवीत होते तर अंबादास त्यांच्या बाजूला बसला होता. गांधीग्राम- अकोला मार्गावर प्रवास सुरू असताना अचानक अंबादास ट्रॅक्टर मधून खाली पडला.त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.(वार्ताहर)

 तीन वेळा बचावला अंबादास
अंबादास हा रिधोरा येथील सोळंके यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर चालक होता.महामार्गावर एका अपघातात ट्रॅक्टर उलटल्याने त्याला दुखापत झाली होती. असा दोनदा झालेल्या अपघातातून तो बचावला होता.काल रात्री नियतीने आपला डाव साधला व अंबादासचा मृत्यू झाला.
 

 

Web Title: Youth's death due to falling through the tractor