रेल्वेखाली चिरडल्याने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 18:54 IST2021-07-20T18:54:09+5:302021-07-20T18:54:15+5:30
A youth died after being crushed under a train : प्रवीण ज्ञानदेव गावंडे वय २८ वर्ष याचा आज सकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना घडली.

रेल्वेखाली चिरडल्याने युवकाचा मृत्यू
मूर्तिजापूर : चिखली कादवी शिवारात रेल्वेखाली आल्याने २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २० जुलै रोजी सकाळी ५.४५ वाजताचे सुमारास घडली.
मूर्तिजापुर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम कासवी (चिखली) येथील प्रवीण ज्ञानदेव गावंडे वय २८ वर्ष याचा आज सकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना घडली. चिखली कासवी ते काटेपूर्णा दरम्यान अप रेल्वेलाईन विद्युत खंबा क्र- ६१७/५--७ दरम्यान सदर घटना घडली. युवकाचा मृतदेह शहर पोलीसाननी वंचित आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर व सहकाऱ्यांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वानखडे करीत आहे.याबाबत मूर्तिजापुर शहर पोलीसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.