इंधन दरवाढी विराेधात युवक काॅंग्रेसचे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 16:56 IST2021-03-02T16:56:39+5:302021-03-02T16:56:45+5:30

Youth Congress agitation against fuel price hike अग्रसेन चौक येथील पेट्रोलपंपावर युवक कॅांग्रेस जिल्हाध्यक्ष महेश गणगणे यांच्या नेतृत्वात हे आंदाेलन करण्यात आले. 

Youth Congress agitation against fuel price hike | इंधन दरवाढी विराेधात युवक काॅंग्रेसचे आंदाेलन

इंधन दरवाढी विराेधात युवक काॅंग्रेसचे आंदाेलन

अकाेला: पेट्रोल - डिझेलच्या दराने शंभरी गाठली असल्याने सामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. याविरोधात मंगळवार दिनांक २ मार्च, २०२१ रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.अकोल्यात अग्रसेन चौक येथील पेट्रोलपंपावर युवक कॅांग्रेस जिल्हाध्यक्ष महेश गणगणे यांच्या नेतृत्वात हे आंदाेलन करण्यात आले. येथील पेट्राेल पंपाच्या फलकावर पंतप्रधान मोदी यांचा निषेध म्हणून 'मै न बोलूंगा, न देखूंगा, न सुनूंगा' असे निषेध फलक लावून व ग्राहकांना पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या शुभेच्छा म्हणून गुलाबाचे फुल देऊन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शहराध्यक्ष अंशुमन देशमुख , प्रदेश महासचिव सागर कावरे, राजेश मते पाटील, सचिव ॲड. विवेक गावंडे, सोशल मिडीया संयोजक भुषण टाले, निलेश मते पाटील, सय्यद आरिफ, फैझल खान, गणेश टाले, अक्षय इनामदार हे सहभागी झाले हाेते.

Web Title: Youth Congress agitation against fuel price hike