शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेला तरुण पूर्णा नदीत वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:29 PM

मंगेश गावंडे (२४)असे या तरुणाचे नाव असून, त्याचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

ठळक मुद्देमंगेश गावंडे हा बैलांना आंघोळ घालण्यासाठी पूर्णा नदीवर गेला होता. सद्या पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. मंगेश गावंडे गटांगळ्या खाऊ लागला व प्रवाहासोबत वाहून गेला.

नया अंदुरा (अकोला): पोळा सनानिमित्त बैलांना आंघोळ घालण्यासाठी त्यांना पूर्णा नदीत घेऊन गेलेला तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याची घटना बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे शुक्रवारी सकाळी घडली. मंगेश गावंडे (२४)असे या तरुणाचे नाव असून, त्याचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.नया अंदुरा येथील मंगेश गावंडे हा तरुण शुक्रवारी सकाळी बैलांना आंघोळ घालण्यासाठी पूर्णा नदीवर गेला होता. सद्या पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याच्या खोलीचा व प्रवाहाचा अंदाज न आल्याने मंगेश गावंडे गटांगळ्या खाऊ लागला व प्रवाहासोबत वाहून गेला. मंगेश नदीत वाहून गेल्याची माहिती गावात कळताच ग्रामस्थांनी नदीकाठावर धाव घेऊन व त्याचा शोध सुरू केला. यावेळी तलाठी सतीश कराड व कोतवाल राजु डांबेराव यांनी घटनास्थळावर धाव घेऊन शोध मोहिमेसाठी सहकार्य केले. नया अंदुरा व नया अंदुरा येथील ग्रामस्थ नदीपात्रात उतरून मंगेश चा शोध घेत असून शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.

 

टॅग्स :AkolaअकोलाPurna Riverपूर्णा नदी