अकोला: दोन धारदार तलवार घेऊन जाणार्या युवकास खदान पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून दोन धारदार तलवारी जप्त केल्या. युसूफअली खदान भागात राहणारा संजयसिंह अजाबसिंह बावरी (३२) हा तलवार घेऊन जात असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला खदान नाक्यावरून तलवार घेऊन जाताना पकडले. त्याचेवर शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ही कारवाई खदानचे ठाणेदार छगनराव इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार दयाराम राठोड, कासम नौरंगाबादी, राम बुंदेले, रघुनाथ नेमाडे, रामसिंग जाधव, अमरदीप गुरू, अविनाश पाचपोर यांनी केली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}