शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळला सर्वसाधारण विजेतेपद; अकोला उपविजेता

By admin | Updated: January 19, 2015 02:35 IST

अमरावती विभागीय जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेचा समारोप.

अकोला: तीन दिवसांपासून वसंत देसाई क्रीडांगण येथे सुरू असलेल्या अमरावती विभागीय जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेचा समारोप रविवारी झाला. स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवित यवतमाळ जिल्हा संघाने विजेतेपद पटकाविले. उपविजेता यजमान अकोला संघ राहिला. स्पर्धेच्या दुसर्‍या दिवसापर्यंंत यजमान अकोल्याचा दबदबा होता. समारोपाच्या दिवशी झालेल्या मैदानी खेळ स्पर्धेत यवतमाळच्या खेळाडूंनी भरीव कामगिरी करीत अकोल्याची पीछेहाट केली.अंतिम सामन्यात क्रिकेटमध्ये अकोला संघाने बुलडाणा संघाचा पराभव केला. फुटबॉलमध्ये बुलडाणा संघाने अकोला संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. मैदानी खेळ स्पर्धेत १00 मी. धावणे प्रकारात राजेश माने, अमरावती, अर्जुन गिरी बुलडाणा, महिलांमध्ये मोहना आवारे यवतमाळ, वैशाली दहीभात वाशिम, २00 मी.धावणेमध्ये बुलडाण्याचे गजानन वाटसर, धनराज चव्हाण वाशिम, महिलामध्ये मोहना आवारे यवतमाळ, वाशिम शुभांगी गंधे, ४00 मी. धावणे अमरावतीचे राजेश माने, यवतमाळचे नितीन डहाके, महिलांमध्ये यवतमाळच्या उषा टेकाम, अकोल्याच्या यमुना बुटे, १५00 मी. धावणेमध्ये यवतमाळचे रवी बुरकुले, अमरावतीचे गजानन भातकुलकर, महिलांमध्ये शुभांगी गंधे वाशिम, गोकुळा झाडोकार अकोला यांनी प्रथम व द्वितीय स्थान पटकाविले. ४ बाय १00 मीटर रिलेमध्ये पुरुषांच्या गटात अकोला संघ विजेता, उपविजेता यवतमाळ संघ राहिला. महिलांच्या गटात यवतमाळ संघाने विजेतेपद मिळविले. वाशिम संघ उपविजेता राहिला. गोळाफेकमध्ये मारोती इंगळे वाशिम, पंकज आसरे अमरावती, महिलांमध्ये शालिनी मारोडे अकोला, ज्योती मसराम यवतमाळ, थाळीफेकमध्ये वाशिमचे मारोती इंगळे, अमरावतीचे चैत्राम जाम्बू अमरावती, लांबउडीमध्ये पुरुष गटात वसीम अहमद यवतमाळ, अमरावतीचे प्रवीण मडावी, महिलांमध्ये यमुना बुटे अकोला, बुलडाण्याच्या निर्मला गोपनारायण, उंचउडीमध्ये दयाराम भिल्लावेकर अमरावती, यवतमाळचे विजय मारकड, महिलांमध्ये वाशिमच्या अश्‍विनी भोळसे, बुलडाण्याच्या वैशाली जाधव यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला.