अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:52 PM2019-02-06T12:52:41+5:302019-02-06T12:52:48+5:30

अकोला : जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी मंगळवारी दिली.

Work on preparation of small land holder farmers list | अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू!

अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू!

googlenewsNext

अकोला : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत जमा करण्यात येणार असून, या योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी मंगळवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक प्रत्येक शेतकरी कुटुंबाला प्रती वर्ष सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य तीन टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून, त्यानुसार योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. योजनेसंदर्भात जिल्ह्यातील तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक, महसूल व कृषी मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व संबंधित अधिकारी-कर्मचाºयांना ६ फेबु्रवारी रोजी संबंधित उपविभागीय अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकाºयांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, ७ ते १० फेबु्रवारी दरम्यान गावनिहाय पात्र शेतकºयांच्या याद्या तयार करून तपासणी करण्यात येणार आहे. पात्र शेतकरी कुटुंबांच्या याद्यांची दोन टक्के तपासणी तहसील स्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाºयांकडून करण्यात येणार आहे., तसेच उपविभागीय अधिकाºयांकडून एक टक्का याद्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तहसील स्तरावर तालुकास्तरीय समित्यांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर पात्र शेतकºयांच्या याद्या २२ ते २६ फेबु्रवारी दरम्यान राज्य आणि केंद्र शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात येणार असल्याचेही निवासी उपजिल्हाधिकारी खंडागळे यांनी सांगितले.

याद्या तयार करण्याचे तहसीलदारांना निर्देश!
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी खंडागळे यांनी दिली.


पात्र शेतकºयांच्या याद्या ‘अपलोड’ करा: मुख्य सचिवांचे निर्देश!
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी मंगळवारी राज्यातील जिल्हाधिकाºयांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ घेतली. त्यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तातडीने तयार करून, पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश अकोला जिल्हाधिकाºयांसह राज्यातील जिल्हाधिकाºयांना मुख्य सचिवांनी दिले.

योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरणाºया अशा आहेत व्यक्ती!
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमधील निकषानुसार या योजनेच्या लाभासाठी संवैधानिक पद धारण केलेले व करणारे आजी-माजी व्यक्ती, आजी-माजी राज्यसभा सदस्य, माजी खासदार, आजी राज्यमंत्री, माजी मंत्री, माजी महापौर, आजी विधान परिषद सदस्य, आजी-माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांचे कर्मचारी, स्थानिक अख्त्यातरीत कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळून स्वराज संस्थांमधील नियमित अधिकारी, मागील वर्षी आयकर भरलेल्या व्यक्ती, दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त निवृत्तीवेतन असलेल्या निवृत्ती वेतनधारक व्यक्ती, नोंदणीकृत व्यावसायिक, डॉक्टर, अभियंता, वकील, सनदी लेखापाल व वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी अपात्र आहेत.

जिल्ह्यात असे आहेत अल्पभूधारक शेतकरी!
तालुका                                                     शेतकरी
अकोला                                                     ५६,९४०
बाळापूर                                                    २९,३७१
पातूर                                                        २५,९५९
मूर्तिजापूर                                                ३४,०१३
बार्शीटाकळी                                              २८,८३३
अकोट                                                      ३९,३४०
तेल्हारा                                                     २९,४९४
....................................................................................
एकूण                                                      २,४३,९५०

 

Web Title: Work on preparation of small land holder farmers list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.