शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या बँक खात्यातून परस्पर रक्कम काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 15:07 IST

बँक खात्यातून आठ हजार, दहा हजार याप्रमाणे चार वेळा असे एकूण ४0 हजार रुपये काढण्यात आले.

अकोला: विदेशातील अज्ञात व्यक्तीने आॅनलाइन खरेदीच्या माध्यमातून एका महिलेच्या बँक खात्यातून परस्पर रक्कम काढल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. ४0 हजार रुपयांनी या महिलेला गंडा घातला आहे. या प्रकरणात महिलेने सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, हे प्रकरण सायबर पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे.सुरत येथील रहिवासी महिला भाऊबीजनिमित्त अकोल्यातील तोष्णीवाल ले-आउट परिसरात माहेरी आली होती. शुक्रवारी दुपारच्या सुमारास या महिलेच्या मोबाइल फोनवर तीन-चार संदेश आले. तिच्या बँक खात्यातून आठ हजार, दहा हजार याप्रमाणे चार वेळा असे एकूण ४0 हजार रुपये काढण्यात आले. त्यामुळे महिलेला धक्काच बसला. पतीसह महिला एका बँकेच्या शाखेत गेली असता, तिला विदेशात अज्ञात व्यक्तीने आॅनलाइन खरेदी करताना, बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेतल्याचे तिला सांगण्यात आले. त्यामुळे महिलेने सायंकाळी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेतली असून, ही तक्रार चौकशीसाठी सायबर पोलिसांकडे पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या महिलेने कोणालाही बँक खाते क्रमांक, एटीएम कोड किंवा बँक खात्याची कोणतीही माहिती कोणालाही सांगितली नाही. तसेच कोणत्या बँकेतून फोन आल्याचाही प्रकार घडला नाही. असे असतानाही या महिलेच्या बँक खात्यातून आॅनलाइन पद्धतीने परस्पर रक्कम काढण्यात आली. त्यामुळे पोलिसांनासुद्धा आश्चर्य वाटले. यासंदर्भात सायबर पोलीस विभागच चौकशी करून नेमका काय प्रकार घडला, याचा छडा लावू शकतो. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाonlineऑनलाइनCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम